Royal Enfield Super Meteor 650 : Royal Enfield ने 2023 च्या सुरुवातीला ग्राहकांसाठी Royal Enfield Super Meteor 650 लाँच केली आहे. ही कंपनीची फ्लॅगशिप बाईक आहे जी भारतातील ग्राहकांसाठी विक्रीसाठी उपलब्ध आहे. पण जानेवारीमध्ये लॉन्च झाल्यानंतर पाच महिन्यांच्या आत कंपनीने मोटरसायकलची किंमत वाढवली आहे. बाईक लाँच झाली तेव्हा तिची किंमत काय होती? आणि आता नवी किंमत काय आहे ? चला जाणून घेऊया.
या बाईकच्या Astral मॉडेलची जुनी किंमत 3 लाख 49 हजार होती, मात्र आता ही बाईक तुम्हाला 3 लाख 69 हजार रुपयांना मिळणार आहे, म्हणजेच या व्हेरियंटची किंमत 5 हजारांनी वाढली आहे.
या बाईकच्या इंटरस्टेलर व्हेरियंटची जुनी किंमत 3 लाख 64 हजार रुपये होती, मात्र आता या मॉडेलची किंमत 5 हजारांनी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे हे मॉडेल 3 लाख 69 हजार रुपयांना मिळेल.
या बाईकचा टॉप व्हेरिएंट सेलेस्टियल आहे ज्याची किंमत आधी 3 लाख 79 हजार रुपये होती आणि आता 5 हजार रुपयांनी वाढल्यानंतर तुम्ही हे मॉडेल 3 लाख 84 हजार रुपयांना खरेदी करू शकाल. आता इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की या रॉयल एनफिल्ड बाईकच्या सर्व प्रकारांच्या किंमती एक्स-शोरूम किमती आहेत.
बाईक मध्ये कोणते फीचर्स आहेत?
तर रॉयल एनफिल्डच्या या फ्लॅगशिप बाइकमध्ये कंपनीने मागील बाजूस तसेच USD फ्रंट फोर्क्समध्ये 5 स्टेपप्रीलोड करण्यायोग्य ड्युअल शॉक दिले आहेत. याशिवाय तुम्हाला सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक आणि एनफिल्ड ट्रिपर नेव्हिगेशन सिस्टीमची सुविधा मिळेल. इंजिन आणि गिअरबॉक्सबद्दल बोलायचे झाले तर या बाईकमध्ये 650 सीसी इंजिन देण्यात आले आहे, तसेच या मोटरसायकलमध्ये तुम्हाला 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळेल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.