दोन आठवड्यांपूर्वी अॅपलने आयफोन १३ सिरीज लॉन्च केल्यानंतर मोबाईल मार्केटमध्ये प्रीमियम सेगमेंटमध्ये अनेक नवनवे स्मार्टफोन लॉन्च होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. ती अपेक्षा खरी ठरत अनेक कंपन्यांनी प्रीमियम सेगमेंटमध्ये स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत सादर केले. त्यापैकी विवो, मोटो आणि आयकूच्या काही निवडक प्रीमियम स्मार्टफोनबाबत थोडक्यात.....
विवो एक्स 70 प्रो
खास कॅमेरा क्वालिटीसाठी ओळख असलेल्या विवोने त्यांच्या फ्लॅगशिप एक्स सिरीजमध्ये आणखी एक नवा स्मार्टफोन लॉन्च केला, तो म्हणजे विवो एक्स 70 प्रो. झायस या कॅमेरा लेन्स विकसित करणाऱ्या जगप्रसिद्ध कंपनीसोबत हातमिळवणी करत विवोने या स्मार्टफोनमध्ये उत्तम दर्जाचा क्वाड कॅमेरा सेटअप दिला आहे. एकाहून एक सरस असे कॅमेरा फीचर असलेला हा स्मार्टफोन तुमची फोटोग्राफीची आवड नक्कीच पूर्ण करू शकतो.
Specifications
डिस्प्ले : 6.56" FHD+ AMOLED Curved Screen
प्रोसेसर : MediaTek Dimensity 1200
रॅम : 8 GB & 12 GB (4 GB Expandable)
स्टोरेज : 128 GB & 256 GB
कॅमेरा : 50 MP (प्रायमरी) + 12 MP (अल्ट्रावाईड) + 12 MP (टेलिफोटो) + 8 MP (ऑप्टिकल झूम)
फ्रंट कॅमेरा : 32 MP
बॅटरी : 4450 mAh
चार्जिंग : 44 वॉट
ऑपरेटिंग सिस्टिम : Android 11
रंग : ऑरोरा डॉन आणि कॉस्मिक ब्लॅक
किंमत : 8 GB + 128 GB : 46,990 रुपये
12 GB + 128 GB : 49,990 रुपये
12 GB + 256 GB : 52,990 रुपये
मोटो एज 20 प्रो
वेगवान आणि तितकंच दर्जेदार प्रोसेसर, 108 मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि फुल एचडी अमोलेड स्क्रीन आदी महत्त्वपूर्ण फीचर्स असलेला मोटो एज 20 प्रो हा स्मार्टफोनदेखील नुकताच भारतात लॉन्च झाला. प्रीमियम रेंजमधील क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 870 प्रोसेसर आणि 144 Hz रिफ्रेश रेटमुळे या स्मार्टफोनची क्वालिटी अधोरेखित होते. खासकरून हायलेव्हल ऑनलाईन गेमिंगसाठी हे दोन्ही वैशिष्ट्ये खासच म्हणावे लागेल.
Specifications
डिस्प्ले : 6.7" FHD+ AMOLED Screen
प्रोसेसर : Qualcomm® Snapdragon 870
रॅम : 8 GB
स्टोरेज : 128 GB
कॅमेरा : 108 MP (प्रायमरी कॅमेरा) + 16 MP (अल्ट्रावाईड कॅमेरा) + 8 MP (टेलिफोटो कॅमेरा)
फ्रंट कॅमेरा : 32 MP
बॅटरी : 4500 mAh
चार्जिंग : 30 वॉट
ऑपरेटिंग सिस्टिम : Android 11
रंग : मिडनाईट स्काय आणि इरिडिसेन्ट क्लाऊड
किंमत : 8 GB + 128 GB : 36,999 रुपये
आयकू झेड 5
गत दोन वर्षात भारतीय बाजारपेठेत दर्जेदार स्मार्टफोन सादर करून आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या आयकूने नुकताच त्यांच्या झेड सिरीजमध्ये आयकू झेड 5 हा नवाकोरा स्मार्टफोन लॉन्च केला. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778G आणि 5000 mAh ची दीर्घकाळ टिकणारी बॅटरी, ती देखील 44 वॉटच्या सुपरफास्ट चार्जरमुळे हा स्मार्टफोन खऱ्या अर्थाने वेगवान ठरतो. 64 मेगापिक्सल ट्रिपल कॅमेऱ्याच्या तुलनेत फ्रंट कॅमेरा चांगला दिला असता, तर हा स्मार्टफोन बेस्ट ठरला असता.
Specifications
डिस्प्ले : 6.67" IPS LCD Screen
प्रोसेसर : Qualcomm® Snapdragon 778G
रॅम : 8 GB & 12 GB (4 GB Expandable)
स्टोरेज : 128 GB & 256 GB
कॅमेरा : 64 MP (प्रायमरी कॅमेरा) + 8 MP (अल्ट्रावाईड कॅमेरा) + 2 MP (मॅक्रो कॅमेरा)
फ्रंट कॅमेरा : 16 MP
बॅटरी : 5000 mAh
चार्जिंग : 44 वॉट
ऑपरेटिंग सिस्टिम : Android 11
रंग : आर्क्टिक डॉन आणि मिस्टिक स्पेस
किंमत : 8 GB + 128 GB : 23,900 रुपये
12 GB + 256 GB : 26,990 रुपये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.