‘वनप्लस’च्या नॉर्ड सीरिजमध्ये आतापर्यंत आलेल्या ‘नॉर्ड सीई’, ‘नॉर्ड २’ आदी स्मार्टफोनला मिळालेल्या संमिश्र प्रतिसादानंतर कंपनीने नुकताच ‘वनप्लस नॉर्ड २T’ हा स्मार्टफोन लॉन्च केला.
‘वनप्लस’च्या नॉर्ड सीरिजमध्ये आतापर्यंत आलेल्या ‘नॉर्ड सीई’, ‘नॉर्ड २’ आदी स्मार्टफोनला मिळालेल्या संमिश्र प्रतिसादानंतर कंपनीने नुकताच ‘वनप्लस नॉर्ड २T’ हा स्मार्टफोन लॉन्च केला. त्यापाठोपाठ ‘नॉर्ड ३’ हा स्मार्टफोन सादर होण्याची बाजारात अपेक्षा होती, मात्र तसे न करता वनप्लसने नॉर्ड २ सीरिजमध्ये अद्ययावत असा नॉर्ड २T स्मार्टफोन बाजारात आणला. अपग्रेडेड मीडियाटेक डायमेन्सिटी १३०० प्रोसेसर, ८०W सुपरफास्ट चार्जर आणि सोनी आयएमएक्स ७६६ इमेज सेन्सर कॅमेरा आदी या स्मार्टफोनचे वैशिष्ट्ये आहेत.
वनप्लसच्या ९, १० सीरिजमध्ये अद्ययावत फीचर्स, आकर्षक लुक आणि दमदार परफॉर्मन्समुळे या सीरिजला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला; मात्र हे स्मार्टफोन महागडे असल्याने वनप्लसकडून किफायतशीर दरातील स्मार्टफोनसाठी वनप्लस नॉर्ड सीरिज लॉन्च करण्यात आली. प्रीमियम सेगमेंटप्रमाणेच फीचर्स देण्याचे प्रयत्न वनप्लसकडून करण्यात आले. मात्र, ग्राहकांची ती अपेक्षा वनप्लसची नॉर्ड सीरिजमधील नॉर्ड सीई, नॉर्ड २ या स्मार्टफोनकडून पूर्ण होऊ शकली नाही. ही बाब लक्षात घेता वनप्लसकडून अद्ययावत वनप्लस ‘नॉर्ड ३’ हा स्मार्टफोन लॉन्च होण्याचीही शक्यता वर्तवली जात होती; मात्र ''नॉर्ड २’मध्ये अपग्रेडेशन करत वनप्लसने नॉर्ड २T हा स्मार्टफोन लॉन्च केला.
वनप्लसने नॉर्ड २T मध्ये प्रीमियम सेगमेंटमधील फीचर्स देण्याचा प्रयत्न करण्यात आला. वनप्लस १० प्रोमध्ये असलेला फ्लॅगशिप ८०W चा सुपरफास्ट चार्जर नॉर्ड २T मध्ये दिला आहे. मात्र, त्यासाठी पूर्वीप्रमाणेच ४५०० mAh बॅटरी आहे. नॉर्ड २T सीरिजमध्ये वनप्लसने महत्त्वाची सुधारणा केली, ती म्हणजे प्रोसेसर ‘नॉर्ड २’मधील क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८१०च्या तुलनेत अपग्रेडेड मीडियाटेक डायमेन्सिटी १३०० प्रोसेसरचा वापर करण्यात आला. ८GB + १२८ GB आणि १२GB + २५६ GB अशा दोन व्हेरियंटमध्ये आलेल्या या स्मार्टफोनमध्ये ऑक्सिजन ओएससह अॅण्ड्रॉईड १२.१ ही ऑपरेटिंग सिस्टिम देण्यात आली आहे.
थोडक्यात वैशिष्ट्ये
डिस्प्ले - 6.7” 90Hz FHD AMOLED
प्रोसेसर - Mediatek Dimensity 1300 5G
रॅम - 8 GB, 12 GB
स्टोरेज - 128 GB, 256 GB
रिअर कॅमेरा - 50 MP + 8 MP + 2 MP
फ्रंट कॅमेरा - 32 MP
बॅटरी - 4500 mAh (80W)
ऑपरेटिंग सिस्टिम - अॅण्ड्रॉईड 12.1 किंमत
रंग - ग्रे शॅडो आणि जेड फॉग
किंमत - 28,999 पासून पुढे
8GB+128GB : 28,999
12GB+256GB : 33,999
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.