AI Tool for Online Dating : आजकाल एआय सर्वच क्षेत्रांमध्ये माणसांची मदत करत आहे. केवळ ई-मेल लिहिणं, फोटो तयार करणं एवढ्यापुरतंच ते मर्यादित राहिलेलं नाही. एका तरुणाने तर आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा (Artificial Intelligence) असा वापर केला आहे, जो कदाचित चॅटजीपीटी बनवणाऱ्या सॅम अल्टमनला देखील अपेक्षित नसावा. तरुणाने एआयच्या मदतीने परफेक्ट लाईफ पार्टनर शोधल्याचा दावा केला आहे.
रशियन माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅलेक्झँडर जदान असं या तरुणाचं नाव आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअर असणाऱ्या या 23 वर्षीय तरुणाने 'टिंडर' या डेटिंग साईटवर अकाउंट उघडलं होतं. त्याने या साईटवर चॅटजीपीटी (ChatGPT) आणि अन्य एआय बॉट्सचा वापर केला. सुमारे 5,000 तरुणींशी चॅटिंग केल्यानंतर त्याला आपल्या मनासारखी जोडीदार मिळाली आहे. (Online Dating using AI)
या तरुणाने सांगितलं, की त्याला हे सगळं करण्यासाठी एका वर्षाचा कालावधी लागला. "मी सुरुवातीला चॅटजीपीटीला हे सांगितलं की मी कशा प्रकारे बोलतो. या प्रोग्रामला ट्रेन करण्यासाठीच बराचसा वेळ खर्च झाला. अखेर ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर या चॅटबॉटने तरुणींशी संवाद साधण्यास सुरुवात केली. यानंतर माझ्यासाठी अयोग्य असणाऱ्या मॅचेसना हे बॉट आपोआप हटवू लागलं." असं अॅलेक्झँडरने सांगितलं. (AI Dating Tools)
यानंतर चॅटजीपीटीने सर्व तरुणींशी संवाद साधत असतानाच, करीना इमरानोव्ना ही तरुणी सर्वात योग्य मॅच असल्याचं अॅलेक्झँडरला सांगितलं. एआय चॅटबॉटनेच या दोघांच्या भेटीसाठी डेट्स फिक्स केल्या, आणि प्रपोज करण्यासाठीही मदत केली. "तुमचं नातं अगदी संतुलित आणि मजबूत आहे, त्यामुळे तू तिला प्रपोज करू शकतोस" असं एआयने या तरुणाला सांगितलं. (AI Life Partner)
यानंतर अॅलेक्झँडरने करीनाला प्रपोज केलं. या दोघांचं लग्नही झालं, आणि आता त्यांचा संसार अगदी सुरळीत सुरू आहे. करीनाला लग्नानंतर समजलं की अॅलेक्झँडर चॅटिंगसाठी एआयचा वापर करत होता. मात्र, यामुळे काही फरक पडत नसल्याचं तिने म्हटलं आहे. तीदेखील अॅलेक्झँडरला आपला परफेक्ट मॅच मानते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.