Sam Altman on AI in India Esakal
विज्ञान-तंत्र

'ChatGPT सारखं एआय बनवणं भारताला शक्य नाही', सॅम अल्टमन यांचं मत; टेक महिंद्राचे सीईओ म्हणाले 'चॅलेंज मंजूर'!

सॅम अल्टमन यांनी या दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदींचीही भेट घेतली.

Sudesh

चॅट जीपीटी हा एआय चॅटबॉट बनवणाऱ्या ओपन एआय कंपनीचे संस्थापक सॅम अल्टमन यांनी भारतामध्ये अशा प्रकारचं तंत्रज्ञान तयार करणं शक्य नसल्याचं मत व्यक्त केलं आहे. भारत दौऱ्यावर असताना एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भारताने असा प्रयत्न करणंही 'होपलेस' असण्याचं ते म्हणाले.

चॅटजीपीटी किंग अशी ओळख असणारे सॅम हे सध्या सहा देशांच्या दौऱ्यावर आहेत. यासाठी ते भारतात आले होते. यावेळी गुगल इंडियाचे माजी उपाध्यक्ष राजन आनंदन यांनी सॅम यांना याबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना सॅम (Sam Altman in India) यांनी हे मत मांडलं.

"आमच्याकडे अतिशय व्हायब्रंट अशी इकोसिस्टीम आहे, तेव्हा विशेषतः एआयच्या क्षेत्रावर जर लक्ष केंद्रित केलं, तर भारतातील स्टार्टअप कंपन्या चॅटजीपीटी सारखं एआय बनवू शकतील का?" असा प्रश्न आनंद यांनी विचारला होता. यासोबतच, या क्षेत्रात भरीव कामगिरीसाठी भारताने कुठून सुरूवात करावी? असंही त्यांनी विचारलं.

यावर उत्तर देताना सॅम अल्टमन (Sam Altman) यांनी स्पष्ट शब्दांमध्ये भारताला हे शक्य नसल्याचं म्हटलं. "या बाबतीत आमच्याशी स्पर्धा करणं अतिशय निरर्थक आहे. त्यामुळे असं काही करण्याचा प्रयत्न देखील करू नका असंच मी तुम्हाला सांगेल, मात्र तसा प्रयत्न करणं हे तुमचं काम आहे. मात्र तुम्ही प्रयत्न केला तरीही ही गोष्ट 'होपलेस' असणार आहे." असं अल्टमन म्हणाले.

चॅलेंज अ‍ॅक्सेप्टेड

सॅम यांच्या या मतावर टेक महिंद्राचे सीईओ सी.पी. गुरनानी (CP Gurnani) यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली. सॅम यांच्या उत्तराचा व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी हे चॅलेंज स्वीकारलं असल्याचं म्हटलं. "ओपन एआयचे संस्थापक सॅम अल्टमन म्हणाले की भारतीय कंपन्यांनी त्यांच्याशी स्पर्धा करणं हे होपलेस आहे. डिअर सॅम, मीदेखील एक सीईओ आहे.. आणि मला हे चॅलेंज मंजूर आहे." अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं.

आनंदन यांचं दुमत

दरम्यान, सॅम अल्टमन यांच्यासोबत झालेल्या या संभाषणाचा व्हिडिओ आनंदन (Rajan Anandan) यांनी ट्विटरवर पोस्ट केला. यासोबतच आपण या मताशी सहमत नसल्याचंही त्यांनी कॅप्शनमधून स्पष्ट केलं. "तुमच्या स्पष्ट उत्तरासाठी धन्यवाद. भारतीय उद्योजकतेच्या ५००० वर्षांच्या इतिहासाने हे दाखवून दिलं आहे, की एका भारतीय उद्योजकाला कधीही कमी लेखू नये. आम्ही नक्कीच याचा (एआय तयार करण्याचा) प्रयत्न करू."

सॅम अल्टमन यांनी या दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदींचीही (Sam Altman meets PM Modi) भेट घेतली. यावेळी एआयच्या भारतातील संधी आणि एआयवर कोणते निर्बंध लागू करायला हवेत याबाबत दोघांमध्ये चर्चा झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election 2024 Results Live : मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT