Samsung  Esakal
विज्ञान-तंत्र

Samsung चा 5G फोन आता 10 हजारांहूनही स्वस्तात मिळणार; आजच आहे शेवटची संधी!

जर तुम्हाला तुमचा फोन बदलायचा असेल, तर हा पर्याय तुमच्यासाठी बेस्ट आहे.

Aishwarya Musale

फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल संपण्याची वेळ आली आहे. ८ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या सेलमध्ये ग्राहकांना जबरदस्त डील आणि डिस्काउंटचा लाभ दिला जात आहे. घरासाठी किराणा सामान किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करणे असो, बहुतांश वस्तू इथून अगदी कमी किमतीत खरेदी करता येतील.

दरम्यान, जर तुम्हाला तुमच्या जुन्या फोनचा थोडा कंटाळा आला असेल तर तुम्ही तो बदलू शकता. कारण फ्लिपकार्ट सेलमध्ये हा फोन अतिशय कमी किमतीत खरेदी करता येणार आहे.

आम्ही ज्या फोनबद्दल बोलत आहोत तो फोन तुम्हाला ९,९९० रुपयांना खरेदी करता येईल. तुम्ही फ्लिपकार्ट सेलमध्ये १७,४९० रुपयांऐवजी फक्त ९,९९० रुपयांमध्ये Samsung Galaxy F14 5G फोन घरी आणू शकता.हा सॅमसंगचा सर्वात स्वस्त 5G फोन असल्याचा दावा केला जात आहे. बँक ऑफर अंतर्गत, ग्राहक हा सॅमसंग फोन १०% सवलतीतही खरेदी करू शकतात.

फोनचे सर्व स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.

Samsung Galaxy F14 5G मध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.6-इंचाचा FHD+ IPS LCD डिस्प्ले आहे.

हा फोन 5G Android 13 वर आधारित OneUI कस्टम स्किनवर चालतो.

या फोनमध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह Exynos 1330 प्रोसेसर आहे. कार्डच्या मदतीने फोनचे स्टोरेज वाढवता येते.

यात स्पष्ट व्हॉइस कॉलसाठी एआय बूस्ट फीचर आहे.

सॅमसंगच्या या बजेट 5G फोनमध्ये ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा, २ मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आणि मागील बाजूस २ मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरा आहे. सेल्फीसाठी फोनच्या पुढील बाजूस १३ मेगापिक्सेल कॅमेरा आहे.

कनेक्टिव्हिटीसाठी, फोनमध्ये 5G, 4G LTE, वाय-फाय, ब्लूटूथ आणि यूएसबी टाइप-सी पोर्टसाठी जागा आहे.

या स्वस्त स्मार्टफोनमध्ये 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,000mAh बॅटरी आहे, जी या फोनची सर्वात खास गोष्ट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra CM : महाराष्ट्रात बिहार पॅटर्न का लागू होऊ शकत नाही? ही आहेत ५ मोठी कारणे

Trending : 'असाच' मुलगा हवा! तरूणीने लग्नासाठी दिली जाहीरात; अजब अटीने उडाली सोशल मिडियावर खळबळ

Swanand Kirkire: कविता किंवा चाल सुचण्याची प्रक्रिया कशी असते? स्वानंद किरकिरेंची स्वास्थ्यमसाठी खास मुलाखत

Mumbai Indians Playing XI: मुंबई इंडियन्सने २३ जणांसाठी १०० कोटी खर्च केले, पण Rohit Sharma चा ओपनिंग पार्टनर कोण?

Share Market Closing: शेअर बाजार घसरणीसह बंद; अदानी समूहाच्या शेअर्स कोसळले

SCROLL FOR NEXT