Samsung Black Friday Sale: तुम्ही जर स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी सेलची वाट पाहत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. सॅमसंगने भारतात Black Friday Sale ची घोषणा केली आहे. या सेल अंतर्गत तुम्हाला कंपनीच्या अनेक डिव्हाइसवर आकर्षक ऑफर्सचा फायदा मिळेल. सेलमध्ये तुम्ही स्मार्टफोन्स, बड्स आणि स्मार्ट वॉचला स्वस्तात खरेदी करू शकता. ग्राहकांना सेलमध्ये ४५ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंटचा फायदा मिळेल.
हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....
ही ऑफर Galaxy Z Fold 4, Galaxy Z Flip 4, Galaxy S22 Ultra, Galaxy S22+, Galaxy S22, Galaxy S21 FE, Galaxy S20 FE, Galaxy Z Fold 3 आणि Galaxy Z Flip 3 सारख्या स्मार्टफोन्सवर मिळत आहे. तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्लॅटफॉर्म्सवरून खरेदी करताना ऑफर्सचा फायदा घेऊ शकता.
४५ हजार रुपयांपर्यंत मिळेल डिस्काउंट
तुम्ही सॅमसंगची अधिकृत वेबसाइट, Amazon, Flipkart आणि ठराविक रिटेल स्टोर्सवरून खरेदी करू शकता. सॅमसंगच्या या सेलचा फायदा २८ नोव्हेंबरपर्यंत घेऊ शकता. ब्लॅक फ्राइडे सेलमध्ये गॅलेक्सी एस२२ स्मार्टफोन फक्त ५२,९९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे.
एस२२ प्लस स्मार्टफोनवर १३ हजार रुपये कॅशबॅकचा फायदा मिळेल. तसेच, या फोनला रिटेल स्टोरवरून खरेदी केल्यास १३ हजार रुपये अपग्रेड बोनस आणि १० हजार रुपये इंस्टंट कॅशबॅक दिले जात आहे. Galaxy Z Flip 3 स्मार्टफोनला तुम्ही फक्त ५९,९९९ रुपयात खरेदी करू शकता. या फोनवर देखील १५ हजार रुपये कॅशबॅक आणि १० हजार रुपये अपग्रेड बोनसचा फायदा मिळेल. तुम्ही Galaxy Z Fold 4 स्मार्टफोनला फक्त १,४६,९९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकतात. यावर ८ हजार रुपये कॅशबॅक आणि ८ हजार रुपये अपग्रेड बोनस दिला जात आहे.
वॉचवर देखील मिळेल ऑफरचा फायदा
सॅमसंगच्या या सेलमध्ये तुम्ही Galaxy Z Fold 4 केल्यास Galaxy Watch 4 Classic BT 46mm ला फक्त २,९९९ रुपयात खरेदी करू शकता. तर गॅलेक्सी झेड फ्लिप ४ फोन ८२,९९९ रुपयात उपलब्ध आहे. यावर ७ हजार रुपये कॅशबॅक अथवा अपग्रेड बोनसचा फायदा घेऊ शकता. सेलमध्ये इतर डिव्हाइसवर देखील ऑफरचा फायदा मिळेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.