Samsung Galaxy A सीरीजचा नवीन स्मार्टफोन Galaxy A04s लवकरच बाजारात दाखल होऊ शकतो. फोनच्या लॉन्च तारखेबद्दल कंपनीकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, प्राइसबाबाने या फोनचे रेंडर आणि स्पेसिफिकेशन्स लीक केले आहेत. लीक झालेले स्पेसिफिकेशन्स पाहता, असे म्हणता येईल की Galaxy A04s गेल्या आठवड्यात लॉन्च झालेल्या Galaxy A04 ची अपग्रेड केलेली आवृत्ती असेल.
लीक केलेले रेंडरनुसार फोन वॉटरड्रॉप नॉच डिझाइनसह बेझल-लेस डिस्प्ले सह सादर करण्यात येईल. फोनची चीन थोडी जाड आहे. लीक झालेल्या फोटोनुसार हा फोन ब्लॅक आणि व्हाईट कलर ऑप्शन्समध्ये येतो .फोनच्या मागील बाजूस, कंपनी Galaxy M13 प्रमाणे ट्रिपल कॅमेरा सेटअप देणार आहे.
लीकनुसार, या सॅमसंग फोनला 90Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.5-इंचाचा HD+ डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हा डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 संरक्षणासह येईल. कंपनीचा हा आगामी फोन किमान 3 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेजसह येऊ शकतो. प्रोसेसर म्हणून, यात ऑक्टा-कोर Exynos 850 चिपसेट मिळण्याची शक्यता आहे.
रिपोर्टमध्ये फोनच्या बॅटरीबद्दलही माहिती देण्यात आली आहे. हा फोन 5000mAh बॅटरीसह येऊ शकतो, जो 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. कॅमेर्याबद्दल बोलायचे झाले तर, फोनला एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळण्याची अपेक्षा आहे.
यात 50 मेगापिक्सेल प्रायमरी लेन्स आणि 2 मेगापिक्सेल मॅक्रो लेन्ससह 2 मेगापिक्सेल पोर्ट्रेट लेन्स दिली जाऊ शकतो. त्याच वेळी, कंपनी सेल्फीसाठी या फोनमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देऊ शकते. OS बद्दल बोलायचे झाल्यास यात Android 12 वर आधारित OneUI 4.1 या फोनमध्ये दिसू शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.