Samsung Galaxy A12 : सॅमसंगचा Galaxy A13 5G हा स्मार्टफोन लवकरच भारतात लॉन्च होणार आहे. हा स्मार्टफोन फेब्रुवारीमध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. या फोनच्या अधिकृत लॉन्चपूर्वी कंपनीने मागील वर्षी भारतात लॉन्च झालेल्या Samsung Galaxy A12 ची किंमत कमी केली आहे. चला तर मग Samsung Galaxy A12 ची किंमत आणि फीचर्सची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.. (Samsung Galaxy A12 Gets Price Drop in India)
Samsung Galaxy A12 स्मार्टफोनची नवीन किंमत
हा फोन दोन व्हेरिएंटमध्ये येतो 4 GB RAM + 64 GB स्टोरेज आणि 6 GB RAM + 128 GB स्टोरेज. 91mobiles च्या रिपोर्टनुसार, ज्यामध्ये 4 GB रॅम वेरिएंटची किंमत आधी 13,999 रुपये होती, जी 1000 रुपयांनी स्वस्त होईल आणि आता ती 12,999 रुपये असणार आहे. त्याचप्रमाणे, 6 जीबी रॅम वेरिएंटची किंमत आधी 16,999 रुपये होती, जी 1000 रुपयांनी स्वस्त होईल आणि आता ती किंमत 15,999 रुपये होईल.
Samsung Galaxy A12 स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy A12 स्मार्टफोन गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये भारतात लॉन्च झाला होता. स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा TFT डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले HD + (720x1,600 pixels) रिझोल्युशनचा आहे. या स्मार्टफोनमध्ये 6GB पर्यंत RAM आणि 128GB पर्यंत स्टोरेजसह ऑक्टा-कोर Exynos 850 प्रोसेसर देण्यात आले आहे. फोनचे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 1 टीबीपर्यंत वाढवता येते.
फोटोग्राफीसाठी यात क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला असून यात 48-मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 5-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड शूटर, 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल, फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 15W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. स्मार्टफोनचे वजन 205 ग्रॅम आहे आणि त्यात साइड-माउंट फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.