Samsung Galaxy A14 4G : हँडसेट निर्माता सॅमसंगने आपला नवीन Samsung Galaxy A14 4G स्मार्टफोन ग्राहकांसाठी लॉन्च केला आहे. महत्त्वाच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, या सॅमसंग मोबाइल फोनमध्ये मोठी स्क्रीन, लेटेस्ट Android आवृत्तीसह ऑक्टा कोअर प्रोसेसर आणि बरेच काही आहे.
आम्ही तुम्हाला या नवीनतम सॅमसंग स्मार्टफोनच्या किंमतीपासून ते वैशिष्ट्यांपर्यंत तपशीलवार माहिती देऊ. (Samsung Galaxy A14 4G 50 MP camera cheap phone launch have look on features)
Samsung Galaxy A14 4G स्पेसिफिकेशन्स :
या फोनमध्ये 6.6-इंचाचा PLS LCD डिस्प्ले आहे जो 90 Hz रिफ्रेश रेट ऑफर करतो. तसेच, डिवाइस मध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. मात्र कंपनीने या हँडसेटमध्ये कोणता चिपसेट वापरला आहे याची माहिती मिळालेली नाही, परंतु असे सांगितले जात आहे की यात MediaTek Helio G80 प्रोसेसर आहे.
रॅम, स्टोरेज आणि सॉफ्टवेअर :
फोनमध्ये 6 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज आहे, जे मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 1 टीबी पर्यंत वाढवता येते. हा फोन Android 13 वर आधारित One UI 5.0 वर काम करतो.
कॅमेरा आणि बॅटरी :
फोनच्या मागील पॅनलवर तीन कॅमेरे आहेत, 50 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा, 2 मेगापिक्सेल मॅक्रो आणि 2 मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर. 13 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा समोर आहे. फोनला उर्जा देण्यासाठी 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे जी 15W चार्जिंगला सपोर्ट करते.
Samsung Galaxy A14 4G ची किंमत :
हा डिवाइस ग्राहकांसाठी कोणत्या किंमतीला लॉन्च करण्यात आला आहे, याबाबतची माहिती सध्या समोर आलेली नाही. पण या हँडसेटची किंमत MYR 826 (सुमारे 15 हजार 300 रुपये) असल्याचे बोलले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.