samsung galaxy m55s smartphone features esakal
विज्ञान-तंत्र

Galaxy M55s Smartphone : एक झलक,सबसे अलग! सॅमसंगचा M सिरीज स्मार्टफोन लवकरच होतोय लाँच; फ्रंट अन् बॅक कॅमेरा फीचर चर्चेचा विषय

Saisimran Ghashi

Galaxy m55s smartphone : सॅमसंग भारतात एक जबरदस्त स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनीची लोकप्रिय M सीरिज मध्ये येणारा हा फोन Samsung Galaxy M55s असेल. या बजेट स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सलचा फ्रंट आणि बॅक असा डबल धमाका असणार आहे. विशेष म्हणजे, या फोनमध्ये तुम्ही एकाच वेळी पुढच्या आणि मागच्या बाजूची व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता.

आगामी आठवड्यात लॉन्च होणाऱ्या या फोनमध्ये 6.7 इंचाचा 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले आणि 50 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा असणार आहे. यापूर्वी सॅमसंग Galaxy M55 भारतात लॉन्च झाला होता. मात्र, M55s हा थोडा वेगळा असणार आहे.

या फोनच्या दोन आकर्षक रंग पर्याय उपलब्ध असतील. ज्यामध्ये कोरल ग्रीन आणि थंडर ब्लॅक रंग असेल. सॅमसंगने अजून रॅम आणि स्टोरेजची माहिती दिलेली नसली तरी, लॉन्चच्या जवळ येताना आणखी काही माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Samsung Galaxy M55s ची वैशिष्ट्ये (अपेक्षित)

  • 6.7 इंच सुपर AMOLED+ डिस्प्ले (120Hz रिफ्रेश रेट आणि 1000 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस)

  • 50 मेगापिक्सल रियर कॅमेरा (OIS सह), 8 मेगापिक्सल अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो कॅमेरा

  • 50 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा

  • एकाच वेळी फ्रंट आणि बॅकने व्हिडिओ रेकॉर्डिंगची सुविधा

  • सॅमसंगच्या 'नाइटोग्राफी' लो-लाइट कॅमेरा फीचर्स आणि नो-शेक कॅम मोड

अशा जबरदस्त फीचर्ससह येणारा हा बजेट स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होणार आहे. आगामी काही दिवसांत या फोनबद्दल अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. सॅमसंगच्या या धमाकेदार स्मार्टफोनची तुम्ही वाट पाहत आहात का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lebanon Pager Blast: वायनाडच्या शिंप्याचा मुलगा नॉर्वेत कसा पोहचला? का चर्चेत आहे जोस टेलर

Latest Marathi News Updates : उच्च न्यायालयायाचा मोठा निर्णय! मुंबई सिनेटची निवडणुक उद्याच होणार

Ruturaj Gaikwad: फिल्डिंगमध्येही दिसला ऋतुचा 'राज', डाव्या हाताने भारी कॅच पकडत रियान परागला धाडलं माघारी

IND vs BAN, 1st Test: 'बॅड लाईट'मुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला, भारताला विजयासाठी ६ विकेट्सटची गरज

OYO Hotels: आता अमेरिकेत सुद्धा होणार ओयोची हवा! 43 अब्ज रुपये गुंतवून घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT