Samsung Galaxy S22 Series  
विज्ञान-तंत्र

सॅमसंगने भारतात लॉन्च केले 3 नवे स्मार्टफोन, पाहा काय आहे किंमत

सकाळ डिजिटल टीम

Samsung Galaxy S22 Series Launch in India : सॅमसंगने आपले तीन दमदार स्मार्टफोन Samsung Galaxy S22, Galaxy S22+ आणि Galaxy S22 Ultra भारतात लाईव्हस्ट्रीमद्वारे लॉन्च केले आहेत. कंपनीने सोशल मीडिया चॅनेलवर हा कार्यक्रम आयोजित केला होता. सॅमसंगने गेल्या आठवड्यात Galaxy Unpacked 2022 इव्हेंटमध्ये Galaxy S22 सीरीज सादर केली. गेल्या वर्षी आलेल्या Galaxy S21 मॉडेलच्या या अपग्रेड केलेल्या आवृत्त्या आहेत.

फोनची भारतात व्हेरिएंटनुसार किंमत किती आहे?

- Samsung Galaxy S22 च्या बेस 8GB+256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 72,999 रुपये आहे, तर 8GB+256GB व्हेरिएंटची किंमत 76,999 रुपये आहे.

- Samsung Galaxy S22+ च्या बेस 8GB+128GB व्हेरिएंटची किंमत 84,999 रुपये आहे तर 8GB+256GB व्हेरिएंटची किंमत 88,999 रुपये आहे.

- Samsung Galaxy S22 Ultra च्या बेस 12GB+256GB व्हेरिएंटची किंमत 1,09,999 रुपये आहे तर टॉप-ऑफ-द-लाइन 12GB+512GB व्हेरिएंटची किंमत 1,18,999 रुपये आहे.

जागतिक स्तरावर, Samsung ने Galaxy S22 Ultra ला 8GB + 128GB आणि 12GB + 1TB व्हेरिएंटमध्ये देखील सादर केले आहे. कंपनीने हे दोन्ही व्हेरिएंट भारतात लॉन्च केलेले नाहीत.

- भारतात Samsung Galaxy S22 सीरीजच्या उपलब्धतेबद्दल तपशील अजून जाहीर केलेला नाही. मात्र, फोन सध्या देशात प्री-रिझर्वेशनसाठी उपलब्ध आहेत. भारतात फोनच्या प्री-ऑर्डर 23 फेब्रुवारीपासून सुरू होतील.

- Samsung Galaxy S22 आणि Galaxy S22+ भारतात ग्रीन, फँटम ब्लॅक आणि फँटम व्हाईट रंगात उपलब्ध असतील, तर Galaxy S22 अल्ट्रा बरगंडीमध्ये, फँटम ब्लॅक आणि फँटम व्हाइट 12GB+256GB आणि बरगंडी आणि फँटम ब्लॅक 12GB+512GB मॉडेलसाठी साठी उपलब्ध असतील.

जागतिक बाजारपेठेतील किंमत

Samsung Galaxy S22 गेल्या आठवड्यात जागतिक स्तरावर लॉंच करण्यात आले होते, ज्याची किंमत $799 (सुमारे 60,000 रुपये) पासून सुरु होते. Galaxy S22+ आणि Galaxy S22 Ultra ची किंमत अनुक्रमे $999 (अंदाजे रु 75,000) आणि $1199 (अंदाजे रु. 99,000) पासून सुरू होते.

मागील वर्षी, Samsung Galaxy S21 भारतीय बाजारात 69,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आला होता. Galaxy S21+ ची सुरुवातीची किंमत रु 81,999 आणि Galaxy S21 Ultra रु 1,05,999 ला लॉन्च करण्यात आली होती.

Samsung Galaxy S22 चे स्पेसिफिकेशन

Samsung Galaxy S22 Android 12 वर चालतो, जे One UI 4.1 वर काम करते. फोनमध्ये 6.1-इंचाचा फुल-एचडी+ डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले दिली आहे. 48-120Hz च्या व्हेरिएबल रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो आणि गोरिला ग्लास व्हिक्टस+ पॅनेलची सुरक्षा त्याला दिली आहे. 4nm ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 चिपसेट स्टँडर्ड म्हणून 8GB RAM सह जोडलेला आहे. Galaxy S22 मध्ये f/1.8 वाइड-एंगल लेन्स आणि ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सह 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर असलेला ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. कॅमेरा सेटअपमध्ये 12-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड शूटर आणि 10-मेगापिक्सेल टेलिफोटो शूटर देखील दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ चॅटसाठी, Galaxy S22 मध्ये समोर 10-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा सेन्सर मिळतो जो f/2.2 लेन्ससह जोडलेला आहे.

Samsung Galaxy S22 256GB पर्यंत ऑनबोर्ड स्टोरेजसह येतो. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth v5.2, GPS/A-GPS आणि USB Type-C पोर्ट यांचा समावेश आहे. सेन्सर्समध्ये एक्सीलरोमीटर, एंबियन्ट लाईट, बॅरोमीटर, गायरो, हॉल, मॅग्नेटोमीटर आणि प्रॉक्सिमिटी सेन्सर यांचा समावेश आहे. यात एक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे. शिवाय, फोन IP68-रेट केलेल्या डस्ट- आणि वॉटर-रेसिस्टंट बिल्डमध्ये येतो.

Samsung Galaxy S22 ला 3700mAh बॅटरी मिळते जी 25W वायर्ड आणि 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. वायरलेस चार्जिंग सपोर्टसह इतर डिव्हाइस चार्ज करण्यासाठी फोन वायरलेस पॉवरशेअरसह देखील येतो. Galaxy S22 चे माप 146.0x70.6x7.6mm आणि वजन 168 ग्रॅम आहे.

Samsung Galaxy S22+ चे स्पेसिफिकेशन्स

सॅमसंग Galaxy S22+ मध्ये रेग्युलर Galaxy S22 सारखीच स्पेसिफिकेशन्स आहेत. यामध्ये Android 12 वर आधारित सारखेच One UI 4.1 स्किन, Snapdragon 8 Gen 1 चिपसेट आणि समान ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिले आहे. मात्र, Galaxy S22+ मध्ये Galaxy S22 च्या तुलनेत 6.6-इंच फुल-HD+ डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले आहे, परंतु त्याच व्हेरिएबल 48-120Hz रिफ्रेश रेटसह येतो. फोन Wi-Fi 6E तसेच अल्ट्रा-वाइडबँड (UWB) सपोर्टसह येतो आणि 15W वायरलेस चार्जिंग आणि वायरलेस पॉवरशेअर सपोर्टसह - 45W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करणारी मोठी, 4500mAh बॅटरी यामध्ये मिळते. लांबी-रुंदी आणि वजनाच्या बाबतीत, Samsung Galaxy S22+ ची माप 157.4x75.8x7.6mm आणि वजन 196 ग्रॅम आहे.

Samsung Galaxy S22 Ultra चे स्पेसिफिकेशन

Samsung Galaxy S22 Ultra देखील Android 12 वर One UI 4.1 वर चालतो. यात 6.8-इंचाचा EDGE QHD+ डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले दिला आहे ज्याचा गेम मोडमध्ये 1-120Hz च्या डायनॅमिक रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेट आहे. फोन Snapdragon 8 Gen 1 चिपसेटसह 12GB पर्यंत RAM ने सुसज्ज आहे. इतर दोन मॉडेल्सच्या विरुध्द Galaxy S22 Ultra क्वाड रीअर कॅमेरा सेटअपसह येतो ज्यामध्ये 12-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड शूटरसह f/1.8 लेन्ससह 108-मेगापिक्सेल प्रायमरी सेन्सरचा समावेश आहे. कॅमेरा सेटअपमध्ये 3x ऑप्टिकल झूमसह 10-मेगापिक्सेल टेलीफोटो शूटर आणि 10x ऑप्टिकल झूम सपोर्टसह 10-मेगापिक्सेल टेलीफोटो शूटर देखील दिले आहे. सेल्फी आणि व्हिडिओ चॅटसाठी Samsung Galaxy S22 Ultra मध्ये समोर f/2.2 लेन्ससह 40-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा सेन्सर मिळतो.

Samsung Galaxy S22 Ultra हा 512GB पर्यंत ऑनबोर्ड स्टोरेजसह येतो. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6e, Bluetooth v5.2, GPS/ A-GPS आणि USB Type-C पोर्ट समाविष्ट आहे. ऑनबोर्ड सेन्सरमध्ये एक्सीलरोमीटर, अॅम्बियंट लाइट, बॅरोमीटर, गायरो, हॉल, मॅग्नेटोमीटर आणि प्रॉक्सिमिटी सेन्सर यांचा समावेश होतो. एक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे.

सॅमसंगने Galaxy S22 Ultra सह S Pen स्टाईलस एकत्रित केले आहे जे फोनवर एका डेडिकेटेड कंपोनंटसह येते तेही अगदी पूर्वीच्या Galaxy Note मॉडेल्सप्रमाणे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे जी 45W वायर्ड आणि 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. यात इतर वायरलेस चार्जिंग-सपोर्ट करणारे डिव्हाइस चार्ज करण्यासाठी वायरलेस पॉवरशेअर देखील दिले आहे. याशिवाय, त्याची लांबी रुंदी 163.3x77.9x8.9 मिमी आणि वजन 229 ग्रॅम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT