Samsung galaxy s22 ultra 
विज्ञान-तंत्र

सॅमसंगच्या 'या' फोनमध्ये GPS कनेक्टिव्हिटीची समस्या; ग्राहकांची तक्रार

सकाळ डिजिटल टीम

Samsung Galaxy S22 Ultra वापरकर्त्यांना त्यांच्या फोनमध्ये GPS वापरताना काही ची समस्यांचा सामना करावा लागत आहे. ग्राहकांच्या तक्रारीनंतर कंपनी ही समस्या सोडवण्यासाठी काम करत आहे. GizmoChina च्या रिपोर्टनुसार, सॅमसंग फोरममधील एका मॉडीरेटरने सांगितले की, कंपनीला समस्येबद्दल माहिती असून सॉफ्टवेअर अपडेटद्वारे ती समस्या सोडवणाचे काम कंपनी करत आहे.

वापरकर्त्यांची तक्रार

अनेक Galaxy S22 Ultra वापरकर्ते सॅमसंगच्या कम्युनिटी फोरमवर तक्रार करत आहेत की, त्यांच्या फोनमध्ये Google Maps आणि GPS (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम) आवश्यक असलेले इतर अॅप्स नीट काम करत नाहीत. वापरकर्त्यांनी केलेल्या तक्रानुसार, युरोपमधील GPS समस्येमुळे अनेक ग्राहका मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहेत.

Galaxy S22 Ultra चे स्पेसिफिकेशन्स

त्याच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, सॅमसंगने या मॉडेलमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा पिक्सेल सेन्सर दिला आहे, जो त्याच्या कॅमेरा लेन्सला अधिक लाईट आणि डेटा कॅप्चर करण्यास मदत करतो. यात मागील बाजूस 12MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा, 108MP कॅमेरा, 10MP टेलिफोटो कॅमेरा (3x ऑप्टिकल झूम) आणि 10MP टेलिफोटो कॅमेरा (10x ऑप्टिकल झूम) दिला आहे. त्याच वेळी, यात सेल्फीसाठी 40MP फ्रंट कॅमेरा असून या कॅमेरा फोनमध्ये अॅडव्हान्स सुपर क्लिअर ग्लास लेन्स दिलेली आहे.

त्याच वेळी, या डिव्हाइसमध्ये तुम्हाला 100X स्पेस झूममध्ये AI सुपर रिझोल्यूशन तंत्रज्ञान पाहायला मिळेल. यासोबतच 10x ऑप्टिकल झूम आणि 10x डिजिटल झूम देण्यात आले आहेत. S22 अल्ट्रा 45W सुपर-फास्ट चार्जिंगला देखील सपोर्ट करतो. Samsung Galaxy S22 Ultra ला 4nm आधारित Qualcomm Snapdragon 8 Gen 1 / Exynos 2200 प्रोसेसर देण्यात आला आहे. Samsung Galaxy S22 Ultra Android 12 आधारित One UI 4.1 वर काम करतो

किंमत किती आहे?

Samsung Galaxy S22 Ultra च्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर त्याची किंमत 1,09,999 रुपयांपासून सुरू होते. त्याच वेळी, त्याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 1,18,999 रुपये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT