Samsung Galaxy S24 FE Features Price,features and availability esakal
विज्ञान-तंत्र

Galaxy S24 FE Smartphone : दमदार फीचर्ससह Galaxy S24 FE झाला लाँच; प्री-बुकिंगला सुरुवात अन् सेलमध्ये मिळतोय बंपर डिस्काउंट,एकदा बघाच

Saisimran Ghashi

Samsung Galaxy S24 FE Smartphone Launched in India : सॅमसंगने अखेर भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये आपल्या बहुचर्चित Galaxy S24 FE स्मार्टफोनचं लाँच केलं आहे. या फोनच्या प्री-बुकिंगला सुरुवात झाली असून, 3 ऑक्टोबरपासून तो विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीला लाँच झालेल्या Galaxy S24 सीरिजमधला हा सर्वात स्वस्त आणि आकर्षक फीचर्ससह असलेला स्मार्टफोन आहे. सॅमसंगने त्यांच्या अधिकृत X हँडलवरून या फोनच्या लाँचची घोषणा केली आहे.

किंमत आणि उपलब्धता

Samsung Galaxy S24 FE दोन स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. त्यामध्ये 8GB RAM + 128GB आणि 8GB RAM + 256GB. याची प्रारंभिक किंमत 59,999 रुपये आहे, तर उच्च व्हेरियंटची किंमत 65,999 रुपये आहे. फोन तीन रंगांमध्ये येतो.त्यामध्ये ब्लू, ग्रेफाइट आणि मिंट. ग्राहकांना फोनची प्री-बुकिंग करून 128GB व्हेरियंटची किंमत 256GB व्हेरियंटच्या किंमतीत मिळवण्याची संधी आहे. याशिवाय, Samsung Shop App वरून खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 2,000 रुपयेचा वाऊचर देखील मिळू शकतो.

Samsung Galaxy S24 FE दमदार फीचर्स

Samsung Galaxy S24 FE मध्ये 6.7-इंचांचा FHD+ Dynamic AMOLED 2X डिस्प्ले दिला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 1900 निट्स पीक ब्राइटनेससह येतो. डिस्प्लेचं संरक्षण Corning Gorilla Glass Victus ने केलं आहे. फोनला IP68 रेटिंगसह वॉटर आणि डस्ट प्रोटेक्शन मिळालं आहे आणि यात मजबूत अॅल्युमिनियम फ्रेम आहे.

फोनमध्ये 50MP मुख्य कॅमेरा, 12MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 8MP टेलिफोटो कॅमेरा असलेली ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 10MP चा फ्रंट कॅमेरा आहे. याशिवाय, 4,700mAh ची बॅटरी आहे जी वायरलेस आणि वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

सॅमसंगच्या Exynos 2400e प्रोसेसरसह Galaxy S24 FE सुसज्ज आहे, ज्यात 8GB RAM आणि 256GB पर्यंत स्टोरेज मिळतं. फोन OneUI 6.0 वर आधारित Android 14 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. स्मार्टफोनमध्ये Galaxy AI सारख्या अनेक आधुनिक तंत्रज्ञानाचं समावेश आहे.

Galaxy S24 FE इतर वैशिष्ट्ये

Galaxy S24 FE मध्ये ड्युअल सिम सपोर्ट आहे, ज्यात एक फिजिकल सिम किंवा ड्युअल eSIM वापरता येऊ शकतो. यात WiFi 6E, Bluetooth v5.3, NFC आणि NavIC सारखे आधुनिक कनेक्टिव्हिटी फीचर्स आहेत. फोनचं वजन 213 ग्रॅम असून त्याचा आकार 162.0 x 77.3 x 8.0 मिमी इतका आहे.

Galaxy S24 FE च्या दमदार फीचर्स आणि आकर्षक किंमतीमुळे स्मार्टफोनच्या चाहत्यांमध्ये या फोनबद्दल मोठी उत्सुकता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akshay Shinde: जंगलात पुरा नाहीतर...; अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्काराला तृतीयपंथीयांचा विरोध, दिला थेट इशारा

WTC 2023-25 Points Table: श्रीलंकेचा १५ वर्षांचा दुष्काळ संपवत न्यूझीलंडला व्हाईटवॉशचा धक्का अन् वाढलं भारत-ऑस्ट्रेलियाचं टेन्शन

Agriculture State Award : राज्यकृषी पुरस्कार सोहळ्यात शेतकऱ्यांचा राडा! उशीर झाल्याने शेतकरी संतापले... कृषी मंत्र्यांनी घातली समजूत

Mallikarjun Kharge Health : स्टेजवर भाषण करतानाचा बिघडली मल्लिकार्जुन खरगेंची तब्येत; सहकाऱ्यांना द्यावा लागला आधार

On This Day: धडाडीचे फलंदाज अन् आता ICC चे दिग्गज सामनाधिकारी, स्टूअर्ट ब्रॉडच्या वडिलांबद्दल या गोष्टी माहित आहेत का?

SCROLL FOR NEXT