Samsung Galaxy S24 esakal
विज्ञान-तंत्र

Bumper Discount On Samsung Galaxy S24 : खुशखबर! Samsung Galaxy S24 स्मार्टफोन चक्क ३० हजारात; दिवाळी ऑफरमध्ये इथे जबरदस्त मिळतोय डिस्काउंट

Saisimran Ghashi

Samsung Galaxy S24 : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बजेटमध्ये चांगला मोबाईल खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. Samsung Galaxy S24 साठी Flipkart वर आकर्षक सवलती आणि ऑफर्स जाहीर झाल्या आहेत. या सवलतीमुळे गॅझेटप्रेमी आणि फोटोग्राफी शौकिनांसाठी हे स्मार्टफोन खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. Samsung Galaxy S24 सिरीज, जी या वर्षाच्या सुरुवातीला (2024) लाँच झाली होती, आता तब्बल 30,000 रुपयांपर्यंत कमी किमतीत उपलब्ध आहे.

Samsung Galaxy S24 ऑफर

सॅमसंग गॅलेक्सी S24 च्या 256GB व्हेरिएंटची मूळ किंमत 99,999 रुपये होती, जी आता फक्त 69,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. म्हणजेच, सुमारे 30 टक्क्यांची सूट मिळत आहे. सवलतीसोबतच एक्स्चेंज ऑफर आणि कॅशबॅकचा लाभ घेतल्यास, हा प्रीमियम फोन आणखी स्वस्तात घेता येणार आहे.

अतिरिक्त बचत आणि फायदे

  • Flipkart वर उपलब्ध असलेल्या या डीलला आणखी फायद्याचे बनवण्यासाठी काही अतिरिक्त ऑफर्स देखील दिल्या आहेत.

  • कूपन डिस्काउंटमध्ये विशेष कूपन वापरून 5,000 रुपयांपर्यंतची अतिरिक्त सवलत मिळवा.

  • कॅशबॅक ऑफरमध्ये Flipkart Axis Bank क्रेडिट कार्ड वापरल्यास 5% कॅशबॅक मिळेल.

  • एक्स्चेंज ऑफरमध्ये जुन्या स्मार्टफोनच्या बदल्यात 40,000 हजारांपर्यंत सूट मिळू शकते. आपल्या जुन्या फोनची स्थिती यावर सवलतीची रक्कम अवलंबून आहे.

  • म्हणजेच हा स्मार्टफोन तुम्हाला 30,000 मध्ये खरेदी करता येईल..

Samsung Galaxy S24 5G ची खास वैशिष्ट्ये

Samsung Galaxy S24 5G मध्ये काही अद्वितीय वैशिष्ट्ये आहेत जी ग्राहकांना आकर्षित करतात.

  • डिझाईन आणि मजबुती: ग्लास बॅक पॅनल, अॅल्युमिनियम फ्रेम, आणि IP68 रेटिंगमुळे फोन वॉटर आणि डस्ट रेसिस्टंट आहे.

  • स्क्रीन प्रोटेक्शन: गोरिला ग्लास विक्टस 2 सह स्क्रीन प्रोटेक्शन आहे.

  • ऑपरेटिंग सिस्टिम: नवीनतम Android 14 वर चालतो.

  • प्रोसेसर आणि परफॉर्मन्स: स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 प्रोसेसर, 12GB रॅम आणि 512GB स्टोरेजसह उच्च कार्यक्षमता आहे.

  • कॅमेरा सेटअप: 50MP + 10MP + 12MP ट्रिपल रिअर कॅमेरा आणि 12MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.

दिवाळीच्या सणासुदीच्या काळात Samsung Galaxy S24 खरेदी करणे उत्तम ठरणार आहे. कमी किंमतीत, उत्तम ऑफर्ससह हा स्मार्टफोन एक चांगला पर्याय आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission : पेजरचे स्फोट होतात, मग EVM कसे हॅक होणार नाहीत... निवडणूक आयोगाने दिलं उत्तर

Sharad Pawar : शरद पवारांना मोठा झटका! निवडणूक आयोगाने फेटाळली चिन्हाबाबातची मोठी मागणी

Savner Assembly Elections 2024: रामटेक वगळता ग्रामीणमधून ‘लिफाफे' बंद; भाजपाचा नवा पॅटर्न !

By-Elections 2024: 15 राज्यांमधील 48 विधानसभा आणि 2 संसदीय मतदारसंघांसाठी पोटनिवडणुका जाहीर, जाणून घ्या वेळापत्रक

खेळाडूला गालावर जाळ काढला! बांगलादेशचे प्रशिक्षक Chandika Hathurusingha ची तडकाफडकी हकालपट्टी

SCROLL FOR NEXT