samsung galaxy watch 5 and samsung galaxy watch 5 pro launched check price features and all details  
विज्ञान-तंत्र

सॅमसंगच्या दोन नवीन स्मार्टवॉच लाँच; ECG अन् BP देखील येणार मोजता

सकाळ डिजिटल टीम

Samsung Galaxy Watch 5 सीरीज बुधवारी Galaxy Unpacked 2022 इव्हेंटदरम्यान लॉन्च करण्यात आली. लेटेस्ट स्मार्टवॉच सीरीजमध्ये Galaxy Watch 5 (दोन आकारात) आणि Galaxy Watch 5 Pro यांचा समावेश आहे. Galaxy Watch 5 मध्ये बायोएक्टिव्ह सेन्सर आहे जो हार्ट सेट, SpO2 आणि स्ट्रेस लेव्हल मोजते. नवीन Galaxy Watch 5 ECG आणि रक्तदाब (BP) मॉनिटरिंग देखील देते. यात इन्फ्रारेड तंत्रज्ञानाचा वापर करणारे तापमान सेंसर आहे. कंपनीचा दावा आहे की हे स्मार्टवॉच 8 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 8 तासांपर्यंत स्लीप ट्रॅकिंग ऑफर करते..

दोन्ही व्हेरिएंट्सची किंमत

Samsung Galaxy Watch 5 ची किंमत 40mm ब्लूटूथ आवृत्तीसाठी $279 (अंदाजे रु. 22,100) आणि LTE आवृत्तीसाठी $329 (अंदाजे रु. 26,100) पासून सुरू होते. मोठ्या Galaxy Watch 5 (44mm) ब्लूटूथ आणि LTE व्हेरियंट्सच्या किंमती अजून जाहीर करायच्या आहेत. 40mm व्हेरिएंटमध्ये ग्रेफाइट, पिंक गोल्ड आणि सिल्व्हर कलर पर्याय आहेत. नंतरच्या बोरा पर्पल स्ट्रैप देण्यात आला आहे.Samsung Galaxy Watch 5 ची 44mm आवृत्ती Graphite, Sapphire आणि Silver रंग पर्यायांमध्ये येते.

Galaxy Watch 5 Pro ची किंमत ब्लूटूथ व्हेरिएंटसाठी $449 (अंदाजे रु. 35,600) आणि LTE व्हेरिएंटसाठी $499 (अंदाजे रु. 39,600) आहे.प्रो मॉडेल ब्लॅक टायटॅनियम आणि ग्रे टायटॅनियम कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. Samsung Galaxy Watch 5 आणि Galaxy Watch 5 Pro दोन्ही सध्या निवडक बाजारपेठांमध्ये प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहेत. हे स्मार्टवॉच 26 ऑगस्टपासून खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे.

Samsung Galaxy Watch 5 चे फीचर्स

Samsung Galaxy Watch 5 WearOS 3.5 वर आधारित One UI Watch 4.5 वर चालते. यात स्पोर्ट बँडसह 'आर्मर अॅल्युमिनियम' केस आहे. 44mm व्हेरिएंट 450x450 पिक्सेल रिझोल्यूशनसह 1.4-इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले दिला आहे आणि लहान 40mm व्हेरिएंट 396x396 पिक्सेल रिझोल्यूशनसह 1.2-इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले दिला आहे. दोन्ही व्हेरिएंटमध्ये ऑलवेज-ऑन डिस्प्ले (AOD) फीचर दिले आहे. कंपनीचा दावा आहे की स्मार्टवॉचवरील सॅफायर क्रिस्टल डिस्प्ले दिली आहे. हे ड्युअल-कोर Exynos W920 SoC सह यामध्ये 1.5GB RAM देखील मिळते. Galaxy Watch 5 मध्ये 16GB ऑनबोर्ड स्टोरेज देखील आहे.

स्मार्टवॉचमध्ये नवीन सॅमसंग बायोएक्टिव्ह सेन्सर मिळतो. कंपनीच्या म्हणण्यानुसार, सेन्सर त्याच्या वापरकर्त्याला हार्ट रेट, SpO2 पातळी आणि स्ट्रे, पातळीसह आरोग्यविषयक माहिती देण्यासाठी करण्यासाठी ऑप्टिकल हार्ट रेट सेन्सर, इलेक्ट्रिकल हार्ट सिग्नल आणि बायोइलेक्ट्रिकल एम्पिडेंस एनालिसीस देखील मिळते. सॅमसंगने गॅलेक्सी वॉच 5 मध्ये इन्फ्रारेड तंत्रज्ञान वापरणाऱ्या तापमान सेन्सरसह देण्यात आले आहे .सेन्सरमध्ये एक्सेलेरोमीटर, बॅरोमीटर, जायरोस्कोप, कंपास आणि लाईट सेन्सर यांचा समावेश होतो.

सॅमसंगने म्हटले आहे की Google Maps अॅप लवकरच गॅलेक्सी वॉच 5 वर येत आहे, जे कनेक्ट केलेल्या स्मार्टफोनपेक्षा स्वतंत्रपणे काम करेल. संगीत आणि ऑडिओ स्ट्रीमिंग करण्यासाठी कंपनी साउंडक्लाउड आणि डीझरसाठी समर्थन देखील जोडत आहे.

Galaxy Watch 5 हे धूळ आणि पाणी (5 ATM) प्रतिरोधकतेसाठी IP68 रेट केलेले आहे. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये Wi-Fi, Bluetooth v5.2, NFC आणि GPS सपोर्ट देण्यात आला आहे. Galaxy Watch 5 (44mm) मध्ये 410mAh बॅटरी आहे. लहान 40mm Galaxy Watch 5 मध्ये 284mAh बॅटरी दिली आहे. दोन्ही व्हेरिएंट WPC वर आधारित वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतात. सॅमसंगच्या मते, बॅटरी 13 टक्के मोठी आहे, आणि 8 मिनिटांच्या चार्जिंगसह 8 तासांची स्लीप ट्रॅकिंग देते. 44mm आवृत्ती 43.3x44.4x9.8mm आहे आणि त्याचे वजन 33.5 ग्रॅम आहे. 40mm आवृत्ती, 39.3x40.4x9.8mm आहे आणि तिचे वजन 28.7 ग्रॅम आहे.

Samsung Galaxy Watch 5 Pro ची फीचर्स

Samsung Galaxy Watch 5 Pro देखील WearOS 3.5 वर आधारित One UI Watch 4.5 वर चालते. यात 1.4-इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले आहे ज्याचे रिझोल्यूशन 450x450 पिक्सेल आहे. नॉन-प्रो मॉडेल प्रमाणे, Galaxy Watch 5 Pro मध्ये देखील अलवेज ऑन डिस्प्ले दिला आहे. यात डी-बकल स्पोर्ट बँडसह टायटॅनियम केस मिळते. स्मार्टवॉच गॅलेक्सी वॉच 5 सोबत एसओसी, रॅम आणि स्टोरेज कॉन्फिगरेशनसह समान फीचर्स दिले आहेत.

Galaxy Watch 5 Pro मध्ये सॅमसंगचा बायोएक्टिव्ह सेन्सर, तापमान सेंसर, एक्सीलरोमीटर, बॅरोमीटर, जायरोस्कोप, कंपास आणि लाईट सेन्सर आहे. Samsung Galaxy Watch 5 च्या प्रो व्हेरियंटमध्ये Wi-Fi, Bluetooth v5.2, NFC आणि GPS सपोर्ट उपलब्ध आहेत.Galaxy Watch 5 प्रमाणे, यात धूळ आणि पाणी (5ATM) प्रतिरोधकतेसाठी IP68 रेटिंग मिळते. या वॉचमध्ये WPC-आधारित वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 590mAh बॅटरी पॅक मिळतो .हे एकूण 45.4 x 45.4 x 10.5 मिमी आहे आणि त्याचे वजन सुमारे 46.5 ग्रॅम आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निवृत्तीपूर्वी CJI DY Chandrachud आमदार अपात्रता प्रकरणावर निकाल देणार? आज सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी

Pune: पुणे पोलिसांनी 'या' टोळीला केले जेरबंद, वाचा काय होता गुन्हा

Corn Upma Recipe: सकाळी नाश्त्यात झटपट बनवा स्वादिष्ट कॉर्न उपीट, नोट करा रेसिपी

Kolhapur North : मधुरिमाराजेंनी माघार का घेतली? ईगो दुखावला, घरगुती समस्या की अन्य कारण..; उलटसुलट चर्चांना उधाण

Happy Birthday Virat Kohli : किंग कोहलीचे रेकॉर्ड तर तुम्हाला माहित्येय; आज भेटूया त्याच्या कुटुंबियांना, जाणून घेऊ त्यांच्याविषयी

SCROLL FOR NEXT