Paris Olympics 2024 Samsung Galaxy Z Flip 6 Smartphone esakal
विज्ञान-तंत्र

Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये सॅमसंगचीच हवा! खेळाडूंना गिफ्ट म्हणून दिला 'हा' स्पेशल स्मार्टफोन

Samsung Galaxy Z Flip 6 Smartphone : यंदा पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार्‍या खेळाडूंना पॅरिस 2024च्या पदकाप्रसंगी वापरण्यासाठी खास आवृत्तीचा Samsung Galaxy Z Flip 6 स्मार्टफोन वापरण्याची परवानगी मिळाली आहे.

Saisimran Ghashi

Samsung Galaxy Z Flip 6 : पॅरिस 2024 ऑलिम्पिकला गेल्या आठवड्यात धमाकेदार सुरुवात झाली. कोविडमुळे मागील ऑलिम्पिक रद्द झाल्यानंतर यंदाची स्पर्धा खेळाडूंसाठीच नाही तर सॅमसंगसारख्या तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनीसाठीही खास आहे. आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार्‍या खेळाडूंना पदक घेतानाच्या प्रसंगी स्मार्टफोनसारख्या वैयक्तिक वस्तू घेऊन येण्यास परवानगी नव्हती. त्यामुळे पदक मिळवताना खेळाडूंचा आनंद आणि उत्साह दूरवरून पाहायला मिळत होता.

पण यंदा पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार्‍या खेळाडूंना पॅरिस 2024च्या पदकाप्रसंगी वापरण्यासाठी खास आवृत्तीचा Samsung Galaxy Z Flip 6 स्मार्टफोन वापरण्याची परवानगी मिळाली आहे. फक्त विशेष आवृत्ती इतकेच नाही तर या फोल्डेबल फोनमध्ये खेळाडूंसाठी खास डिझाईन आणि वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत. चला तर मग पाहुयात काय खास आहे या Samsung Galaxy Z Flip 6 Olympic Edition मध्ये.

हे Samsung Galaxy Z Flip 6 स्मार्टफोन आकर्षक पिवळ्या रंगा. यावचे आहेर सुवर्ण रंगात ऑलिम्पिक रिंग्स आणि पॅरालिम्पिक अॅगिटोस कोरलेले आहेत. या खास फोनसाठी सॅमसंगने पॅरिसच्या पुरुषांच्या लेदरच्या वस्तूंसाठी प्रसिद्ध असलेल्या Berluti या कंपनीसोबत भागीदारी केली आहे. या कंपनीने प्रत्येक फोनसाठी खास लेदरचे कव्हर डिझाईन केले आहे. हे लेदर व्हेनेझिया शहरापासून आणलेले असून त्यावर ऑलिम्पिक रिंग्जच्या रंगांची प्रेरणा घेऊन बनवलेले खास डिझाईन आहे.

हे खास फोल्डेबल फोन जगभरात विक्रीसाठी येण्याआधीच सॅमसंगने ते सर्व पॅरिस 2024 ऑलिम्पिकमधील सहभागी होणार्‍या खेळाडूंना दिले आहेत. या मर्यादित आवृत्तीच्या फोनमध्ये 100GB डाटा आणि अमर्यादित कॉल आणि मेसेजेस उपलब्ध आहेत. यामुळे खेळाडू स्पर्धेदरम्यान ऑनलाईन राहून मित्र आणि कुटुंबियासोबत संपर्कात राहू शकतात.

यामध्ये अनेक खास Samsung AI वैशिष्ट्येही समाविष्ट आहेत. यामध्ये थेट अनुवाद (Live translation) करणे आणि मजकूर रचना (Text Compose) यांचा समावेश आहे. ज्यामुळे खेळाडू अधिक लोकांपर्यंत सहज पोहोचू शकतात. याशिवाय, या फोल्डेबल फोनमध्ये AI आधारित अनुवादक (Translator) आहे. त्यामुळे खेळाडू इतर खेळाडू आणि स्वयंसेवकांशी थेट संवाद साधू शकतात आणि स्क्रीनवर अनुवाद पाहून त्यांचे म्हणणे समजून घेऊ शकतात.

हे Samsung Galaxy Z Flip 6 Olympic Edition तंत्रज्ञान क्षेत्रातील उत्साही आणि संग्राहकांसाठी आकर्षक असले तरी ते सर्वसाधारण जनतेसाठी उपलब्ध नाही. हे फक्त पॅरिस 2024 ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार्‍या सुमारे 17,000 खेळाडूंनाच उपलब्ध आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA: संजू सॅमसनची Century! ट्वेंटी-२०त विराट-रोहितच काय, तर एकाही भारतीयाला नाही जमलाय हा विक्रम

Assembly Election 2024 : पालघर जिल्ह्यात भाजपाला मोठा धक्का; कुणबी सेनेचा बहुजन विकास आघाडीला पाठिंबा

Champions Trophy 2025 : BCCI पाकिस्तानात न जाण्यावर ठाम; PCB म्हणते लेखी द्या, मग बघतोच...! IND vs PAK यांच्यात 'वॉर' जोरदार

SA vs IND T20I: अन् सूर्याच्या टीम इंडियानं राष्ट्रगीताचा अपमान होऊ दिला नाही; साऊंड बंद झाला, पण...

Trending News: अरे ये कैसा हुआ रे बाबा ! नवरा-बायकोचं भांडण अन् रेल्वेला लागला तीन कोटींचा चुना

SCROLL FOR NEXT