Samsung Offers eSakal
विज्ञान-तंत्र

Samsung Offers : नवीन फोन घ्यायचाय? सॅमसंगच्या तगड्या मोबाईलवर मिळतोय बंपर डिस्काउंट! पाहा ऑफर्स

Sudesh

Samsung Offers : तुम्ही जर सॅमसंगचा मोबाईल घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. कंपनीने आपल्या काही स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी कपात केली आहे. अत्‍यंत लोकप्रिय गॅलॅक्‍सी A05s, A54 5G आणि गॅलॅक्‍सी A34 5G स्‍मार्टफोन्‍सवर आकर्षक ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत.

सॅमसंग गॅलेक्सी A05s या स्मार्टफोनची मूळ किंमत १३,४९९ रूपये (४ जीबी + १२८ जीबी) आणि १४,९९९ (६ जीबी + १२८ जीबी) एवढी आहे. मात्र इन्स्टंट २,००० रुपये डिस्काउंटसह यांची किंमत आता अनुक्रमे ११,४९९ रूपये व १२,९९९ झाली आहे.

या स्मार्टफोनमध्ये क्‍वॉलकॉम स्‍नॅपड्रॅगन ६८० हा प्रोसेसर देण्यात आला आहे. तसंच यामध्ये ६.७१ इंच फुल एचडी+ ९० हर्टझ डिस्‍प्‍ले देण्यात आला आहे. ५० मेगापिक्सलचा कॅमेरा आणि ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी यामध्ये देण्यात आली आहे. गॅलॅक्‍सी A05s ४ वर्षांचे सिक्‍युरिटी अपडेट्स आणि ओएस अपग्रेड्सच्‍या २ जनरेशन्‍ससह फ्यूचर-रेडी स्‍मार्टफोन आहे.

A34 5G

या स्मार्टफोनच्या बेस व्हेरियंटची किंमत ३०,९९९ रुपये आहे. यावर तब्बल ३,५०० रुपयांचा थेट डिस्काउंट आणि १,५०० रुपयांचा अतिरिक्त कार्ड डिस्काउंट मिळत आहे. यामुळे तुम्ही हा स्मार्टफोन केवळ २५,९९९ रूपयांमध्‍ये खरेदी करू शकता. याचा ८ जीबी + २५६ जीबी व्‍हेरियंट फक्‍त ३३,४९९ रूपयांमध्‍ये खरेदी करू शकता, ज्‍याची मूळ किंमत ३८,९९९ रूपये आहे.

गॅलेक्सी A54 5G आणि A34 5G या दोन्ही स्मार्टफोनमध्ये IP67 रेटिंग देण्यात आली आहे. यासोबत यामध्ये ५००० mAh बॅटरी, सुपर AMOLED डिस्प्ले आणि इतर भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत.

A54 5G ऑफर्स

या स्मार्टफोनच्या ८ जीबी+१२८ जीबी व्हेरियंटची किंमत ३३,४९९ रूपये आहे. ३,५०० रूपयांची सूट आणि २,००० रूपयांची बँक कॅशबॅक मिळून ही किंमत आहे. याच फोनच्या ८ जीबी + २५६ जीबी व्हेरियंटची ऑफरमधील किंमत ३५,४९९ रूपये आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

SCROLL FOR NEXT