Scammer WhatsApp Chat eSakal
विज्ञान-तंत्र

Scammer WhatsApp Chat : कशी होते ऑनलाईन फसवणूक? स्कॅमरने स्वतःच सांगितली पद्धत; व्हॉट्सअ‍ॅप चॅट होतंय व्हायरल

बंगळुरूमधील चेट्टी अरुण नावाच्या एका व्यक्तीने स्कॅमरशी झालेला आपला संवाद आपल्या एक्स हँडलवरुन शेअर केला आहे.

Sudesh

WhatsApp Chat with Scammer : आजकाल ऑनलाईन फसवणूक होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. जवळपास सर्व व्यवहार मोबाईलवर होत असल्यामुळे, लोकांचे मोबाईल हॅक करण्याचा प्रयत्न सायबर गुन्हेगार करत असतात. आजकाल यासाठी व्हॉट्सअ‍ॅपची देखील मदत घेण्यात येत आहे. एका स्कॅमरने स्वतःच याची एक पद्धत रिव्हील केली आहे.

बंगळुरूमधील चेट्टी अरुण नावाच्या एका व्यक्तीने स्कॅमरशी झालेला आपला संवाद आपल्या एक्स हँडलवरुन शेअर केला आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर झालेल्या या चॅटचे स्क्रीनशॉट्स त्यांनी एका थ्रेडमध्ये पोस्ट केले आहेत. यामध्ये दिसतंय की कसा हा स्कॅमर गप्पा मारत मारत खुलत जातो, आणि फसवणुकीची आपली पद्धत सांगतो.

कसा सुरू झाला संवाद?

चेट्टी यांना सुरुवातीला या स्कॅमरने एक APK फाईल पाठवली होती. यानंतर चेट्टींनी सांगितलं, की मी आयफोन वापरतो, आणि APK फाईल ही अँड्रॉईड अ‍ॅप्ससाठी वापरली जाते. यानंतर त्यांनी स्कॅमरला ब्लॉक करण्याऐवजी त्याच्याशी गप्पा मारण्यास सुरुवात केली.

"मी हे अ‍ॅप डाऊनलोड केलं असतं तर काय झालं असतं?" असं अरुण यांनी स्कॅमरला विचारलं. त्यावर स्कॅमरने सांगितलं, की त्यानंतर तुमचे सगळे मेसेज आम्हाला मिळतात. अगदी व्हॉट्सअ‍ॅप मेसेज आणि बँकांचे ओटीपी देखील.

कशी होते फसवणूक?

यावर अरुण विचारतात, की तुम्हाला नंबर कुठून मिळतात? तसंच तुमच्याकडे कार्ड डीटेल्स नसतील, तर फक्त ओटीपी घेऊन तुम्ही काय करता?

त्यावर स्कॅमर सांगतो, की "एखाद्या व्यक्तीचा नंबर मिळवणं आजकाल अवघड नाही. तसंच, कार्ड डीटेल्स हे फ्लिपकार्ट, अमेझॉन अशा शॉपिंग वेबसाईट्सवरुन मिळून जातात." बऱ्याच जणांनी याठिकाणी आपले कार्ड सेव्ह केलेले असतात. ठराविक लिमिटपर्यंत ट्रान्झॅक्शन करण्यासाठी CVVची गरज भासत नाही. केवळ ओटीपी पुरेसा असतो. याचाच फायदा हे स्कॅमर्स घेतात.

कशी टाळाल फसवणूक?

अशा एपीके फाईल्स डाऊनलोड न करण्याचा सल्लाही स्कॅमरने त्यांना दिला. तसंच, चुकून अशी फाईल डाऊनलोड झाल्यास फोन रिस्टार्ट करण्याचा सल्लाही त्याने दिला. एकूणच, हा स्कॅमर स्वतःच फसवणूक कशी टाळायची याचे धडे अरुण यांना देत होता.

यासोबतच स्कॅमर अरुणसोबत खासगी आयुष्याबद्दल देखील गप्पा मारत होता. त्याच्या डीपीमध्ये कोण आहे? त्यांचं फेसबुक अकाउंट आहे का? असे प्रश्न तो विचारत होता. जेव्हा अरुण यांनी सांगितलं, की हे चॅट्स ते सोशल मीडियावर शेअर करणार आहेत; तेव्हा आपले सर्व मेसेज त्याने डिलीट केले, आणि पोलिसांना याबाबत माहिती न देण्याचं आवाहन देखील त्याने केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT