DSIR meeting highlights women scientist support esakal
विज्ञान-तंत्र

Women Scientists Grant : सरकारने केली मोठी घोषणा! ३०० महिला शास्त्रज्ञांना मिळणार संशोधन अनुदान;मिळणार या सुविधा,जाणून घ्या

Saisimran Ghashi

Scientists Grant : संशोधन क्षेत्रामध्ये महिला शास्त्रज्ञांनी आपले अव्वल स्थान बनवले आहे.अनेक महिला शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या मोहीमांसाठी मोलाचे योगदान देऊन त्या मोहीमा किंवा संशोधन यशस्वी केले आहे.अश्या महिला शास्त्रज्ञांना नेहमीच शासनाकडून प्रशंसा मिळत असते. आता या महिला शास्त्रज्ञांना आर्थिक प्रोत्साहन देण्यासाठी नवी योजना आखली जात आहे.

शुक्रवारी (१४ जून) विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी जाहीर केले की CSIR-ASPIRE योजनेअंतर्गत ३०० महिला शास्त्रज्ञांना तीन वर्षांसाठी संशोधन अनुदान मिळणार आहे. शास्त्रीय आणि औद्योगिक संशोधन विभागाच्या (DSIR) आढावा बैठकीत सिंह यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नागरिकांच्या जीवनमान उन्नतीच्या दृष्टिकोनातून विज्ञान आणि तंत्रज्ञानातील नवकल्पनांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.

या योजनेत ३००० प्रस्ताव प्राप्त झाले होते, जे शासनाच्या महिला शास्त्रज्ञांना पाठिंबा देण्याच्या प्रयत्नांचे प्रतीक आहे. निवड प्रक्रिया आणि स्वतंत्र पुनरावलोकनानंतर, क्षेत्रनिहाय संशोधन समित्यांनी ३०१ संशोधन प्रस्तावांना समर्थन देण्याची शिफारस केली आहे.

तसेच, मंत्री सिंह यांनी DSIR ला सीवीड मिशनला पुढे नेण्याचे आणि त्याच्या व्यावसायिक लागवडीसह हरित अर्थव्यवस्था प्रोत्साहन देण्यासाठी निर्देश दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Fire: मुंबईतील इंडस्ट्रियल इस्टेट परिसर स्फोटांच्या आवाजाने हादरला, आगीचा भयानक व्हिडिओ व्हायरल

Amravati Stone Pelting: अमरावतीत भयंकर प्रकार! पोलीस स्टेशनवरच हजारो लोकांकडून दगडफेक, 21 पोलीस जखमी

Latest Maharashtra News Updates: आमदार सतेज पाटील यांनी धरला ठेका

Monsoon : महाराष्ट्रातून मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरू

Today Navratri Colour: नवरात्रीचा चौथा रंग केशरी, 'या' मराठी अभिनेत्रींच्या लूकवरून घ्या आउटफिट आयडिया, दिसाल सुंदर

SCROLL FOR NEXT