पुणे : विज्ञान-तंत्रज्ञानातील अनेक रहस्य उलगडण्याकरिता, नवसंशोधन, नवकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी प्रयोगशील राहावे लागते. सायन्स कट्ट्यावरील चर्चेतून एखाद्या जटिल विषयासंदर्भात अनेक वाटा सापडतात आणि संशोधनाचा थांबलेला प्रवास नव्या दिशेने सुरु होतो. त्यातून आंतरशाखीय संशोधनाला चालना मिळते, असा विश्वास विज्ञानप्रेमींनी व्यक्त केला.
शिक्षण व संशोधनाच्या नव्या वाटा उलगडणाऱ्या ‘मॉडेल कट्टा’ या चर्चासत्राचे स. प. महाविद्यालयातील लेडी रमाबाई सभागृहात आयोजन केले होते. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल इंजिनिअर्स, मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग, स. प. महाविद्यालय, जीविधा पुणे, ज्ञानप्रबोधिनी आणि राजहंस प्रकाशन या संस्थांच्या वतीने आयोजित कट्ट्यावर जीवशास्त्राचे संशोधक डॉ. मिलिंद वाटवे यांच्या 'कट्टा मॉडेल' पुस्तकाच्या निमित्ताने गप्पा रंगल्या.
आघारकर संशोधन संस्थेतील डॉ. मंदार दातार, बंगळुरू येथीलराष्ट्रीय जैव विज्ञान केंद्रातील (एनसीबीएस) डॉ. कृष्णमेघ कुंटे, कॅनबायोसिसच्या संचालिका संदीपा कानिटकर, डॉ. मिलिंद वाटवे, हिंदुस्थान अँटिबायोटिक्सचे माजी संचालक यशवंत घारपुरे यांनी विचार मांडले. ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी समारोपाचे भाषण केले.
प्रसंगी राजहंस प्रकाशनाचे दिलीप माजगावकर, मराठी विज्ञान परिषदेचे प्रा. राजेंद्रकुमार सराफ, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल इंजिनिअर्सचे डॉ. सुयोग तराळकर, जीविधांचे राजीव पंडित आदी उपस्थित होते.
डॉ. माधव गाडगीळ म्हणाले, ‘‘पारंपरिक शिक्षणापेक्षा ज्ञान व आकलन अधिक महत्वाचे असते. ग्रामीण भागातील अनेक मुलांमध्ये ज्ञान आहे. त्यांना चालना देण्याची गरज आहे. पूर्वीच्या काळी पिंपळाचे पार असत. त्यावर गावगप्पा होत. त्यातून अनेक नवीन माहिती मिळत असे. माहिती संकलनाचा कट्टा किंवा पार हा एक स्रोत आहे.
विज्ञानातील प्रगतीसाठी असे कट्टे उपयुक्त ठरतील. मलादेखील अभ्यास, संशोधन करताना अशा स्वरूपाच्या पारांचा, कट्ट्याचा खूप उपयोग झालेला आहे.’’ ‘आयसर’मधील संशोधिका डॉ. मनवा दिवेकर जोशी यांनी सूत्रसंचालन केले. राजीव पंडित यांनी आभार मानले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.