Exercise Pill eSakal
विज्ञान-तंत्र

Exercise Pill : आता जिमला जायची गरजच नाही? वैज्ञानिकांनी तयार केली 'व्यायामाची गोळी'.. कसं करते काम?

Pill for Exercise : वॉशिंग्टन युनिवर्सिटीच्या वैज्ञानिकांनी ही गोळी तयार केली आहे. यातील लीड रिसर्चर आणि केमिस्ट बाहा एलगेंडी यांनी याबाबत माहिती दिली.

Sudesh

Exercise Pill gives similar benefits as going to Gym : आपल्यापैकी कित्येक जणांना व्यायामाचा कंटाळा येतो. रोज उठून जिमला जा, किंवा बाहेर पडून पळायला जाणे यापेक्षा बेडमध्ये झोपून राहणंच बरं असं बहुतांश लोकांना वाटत असतं. काहीही व्यायाम न करता फिट राहण्याची जादू आपल्याकडे हवी असं जर तुम्हाला वाटत असेल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

एखाद्या दिवशी अंघोळ न करता, ज्याप्रमाणे आपण 'अंघोळीची गोळी' घेतली म्हणतो; अगदी तसंच आता आपल्याला 'व्यायामाची गोळी' खाता येणार आहे. अमेरिकेतील वैज्ञानिकांनी ही गोळी तयार केली आहे. ही Excercise Pill घेतल्यानंतर आपल्या शरीरामध्ये तसेच बदल घडतील, जसे व्यायाम केल्यानंतर घडतात असा दावा वैज्ञानिकांनी केला आहे.

वॉशिंग्टन युनिवर्सिटीच्या वैज्ञानिकांनी ही गोळी तयार केली आहे. यातील लीड रिसर्चर आणि केमिस्ट बाहा एलगेंडी यांनी याबाबत माहिती दिली. त्या म्हणाल्या, की या गोळीचे अपेक्षित असे परिणाम उंदरांवर दिसले आहेत. जेव्हा उंदरांनी ही गोळी खाल्ली, तेव्हा त्यांच्या शरीरातील मेटाबॉलिजम अगदी तसंच बदललं, जसं व्यायाम केल्यानंतर बदलतं. सातत्याने हे औषध घेतल्यानंतर उंदरांच्या मांसपेशींची ताकद वाढली, तसंच त्यांची फिटनेस वाढून शारीरिक क्षमताही सुधारली.

या गोळीचं रासायनिक नाव SLU-PP-332 असं आहे. उंदरांवर या गोळीचा परिणाम ज्याप्रमाणे दिसला, त्याचप्रमाणे माणसांमध्येही दिसू लागला तर हा एक ऐतिहासिक शोध ठरेल. या गोळीचा वापर दुर्मिळ आजारांवर उपचार करण्यासाठी देखील करता येऊ शकतो, असं संशोधतांनी म्हटलं आहे.

कशी काम करते गोळी?

जेव्हा आपण व्यायाम करतो, तेव्हा शरीरामध्ये एस्ट्रोजन रिलेटेड रिसेप्टर्स (ERR) कार्यान्वित होतात. हे रिसेप्टर्स मांसपेशी, हृदय आणि मेंदूमध्ये देखील आढळतात. मेटाबॉलिजम, इंफ्लेमेशन, होमियोस्टेसिस, शारीरिक विकास, कोशिकांची वाढ आणि कोशिकांच्या रीप्रॉडक्शनसाठी हे रिसेप्टर मदत करतात. व्यायामाची गोळी या रिसेप्टर्सना कार्यान्वित करते.

मानवी चाचणीची परवानगी मागितली

एलगेंडी यांनी सांगितलं, की हे औषध बनवण्याच्या आधी आम्ही एक स्टार्टअप कंपनी सुरू केली. पेलाजो फार्मास्युटिकल नावाच्या या कंपनीने हे औषध तयार केलं आहे. याची उंदरांवरील चाचणी यशस्वी झाल्यानंतर आता आम्ही क्लिनिकल ट्रायलची परवानगी मागितली आहे.

व्यायामही आहे गरजेचा

संशोधकांनी सांगितलं, की ही गोळी एकदाच घेऊन उंदरांच्या शारीरिक क्षमतेमध्ये 70 टक्के वाढ झाली होती. दुसऱ्यांदा ही गोळी घेतल्यानंतर आणखी 10 टक्के ग्रोथ दिसून आली. मात्र, ही गोळी व्यायामाची जागा घेऊ शकणार नाही. केवळ गोळी खाऊन व्यायामाचे फायदे मिळतात म्हणून व्यायाम बंद करणं योग्य नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT