Shardiya Navratri 2024: Sakal
विज्ञान-तंत्र

Shardiya Navratri 2024: 'तूच दुर्गा, तूच काली, तू...' नवरात्रीत फोटो अन् रिल्ससाठी वापरा ट्रेंडी गाणी, इंस्टाग्रामवर पोस्ट करताच लाईक्स, व्हियूज वाढतील

पुजा बोनकिले

Navratri Trending Songs and #Tags: 'तूच दुर्गा, तूच काली, तू...' देशभरात नवरात्रीचा उत्साह आनंदात साजरा केला जातो. घरोघरी माता दुर्गेच्या स्वागतासाठी स्वच्छ झाली असून सजावटची लगबग सुरू झाली आहे. यंदा ३ ऑक्टोबरला शारदीय नवरात्री साजरी केली जाणार आहे. बाजारापेठा ओटीचे साहित्य, दांडिया, रंगीत कपडे यासारख्या अनेक वस्तूंनी सजली आहे.

हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला खुप महत्व आहे. नऊ रात्रीत नऊ दिवस माता दुर्गेच्या नऊ रूपांची मनोभावे पूजा केली जाते. मान्यतेनुसार माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केल्यास सर्व संकट दूर होतात. तसेच माता दुर्गाला आवडते नैवेद्य आणि फुल अर्पण केल्यास प्रसन्न होते.

नवरात्री दरम्यान अनेक लोक सोशल मिडियावर माता दुर्गासोबत फोटो, व्हिडिओ आणि रिल्स पोस्ट करतात. तुम्हालाही यंदा माता दुर्गासोबत फोटो आणि रिल्स व्हायरल करायचे असतील तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आम्ही तुम्हाला नवरात्रीत फोटो आणि रिल्सला अधिक लोकांपर्यंत आणि जास्तीत जास्त लाईक्स कसे मिळवता येतील यासाठी सोप्या टिप्स सांगणार आहोत,

नवरात्रीची ट्रेंडी गाणी

ढोलीडा

हे गाणं गंगुबाई काठीवाडी मधील आहे. हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित झाला आहे. या गाण्यावर आलियाने उत्तम नृत्य केले आहे. तुम्ही नवरात्रीत फोटो किंवा रिल्ससाठी हे गाण लावू शकता. शैल हाडा आणि जान्हवी श्रीमानकर यांनी या गाण्याला आवाज दिला आहे.

शुभारंभ

या उत्साही गाण्याचा वापर करून फोटो आणि रिल्स जास्तीत जास्त व्हायरल करू शकता. हे गाणं श्रुती पाठक आणि दिव्या कुमार यांनी हे गायलं होतं. काय पोचे या चित्रपटातील हे गाणं आहे.

चोगडा

हे गाणं लवयात्रीमधील आहे. हे गाणं गरबा किंवा दांडिया करताना लावले जाते. या नवरात्रीत तुम्ही हे गाणं फोटो किंवा रिल्ससाठी वापरून शकता.

उडी उडी जाये

रईस या चित्रपटामधील उडी उडी जाये हे गाणं आहे. भूमी त्रिवेदी, करसन सरगठिया आणि सुखविंदर सिंग यांनी हे गाणं गायलेले आहे. या गाण्यात शाहरुख खान आणि माहिरा खान आहेत. नवरात्रीसाठी हे गाणं खुप उत्तम आहे.

नगाडा संग ढोल

गोलियों की रासलीला राम-लीला या चित्रपटामधील हे गाणं आहे. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग या दोघांनीही या चित्रपटात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या गाण्यात दीपिकाने उत्तम नृत्य केले आहे. नवरात्रीत तुमच्या फोटो आणि व्हिडिओसाठी हे गाणं उत्तम आहे.

नवरात्रीसाठी हटके कॅप्शन

नवरात्रीत नऊ दिवस माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. नऊ दिवस वेगवेगळे सुंदर ड्रेस परिधान करून महिला आणि पुरूष दर्शनाला जातात. तसेच देवीसमोर गरबा किंवा दांडिया करतात. नवरात्रीत फोटो आणि रिल्स व्हायरल होण्यासाठी माता दुर्गाची गाणी किंवा भजनाच्या सुरूवातीच्या ओळी कॅप्शनमध्ये लिहू शकता. जसे की, 'उदे ग अंबे उदे', 'तूच दुर्गा, तूच काली, तू..' तुम्हाला ट्रेंडी कॅप्शन ठेवायचे असेल तर पुढील व्हिडिओची मदत घेऊ शकता.

याप्रमाणे हॅशटॅग वापरून नवरात्रीचे व्हिडिओ, रिल्स जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकता.

नवरात्रीच्या फोटो, रिल्स आणि व्हिडिओसाठी पुढील हॅशटॅश वापरू शकता

#navratri #navratri2024 #navratrispecial #navratrisongs #shardiyanavratri #navratrifestival #garba #dandiya #navratricelebration #navratripuja #navratriculture

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

देवेंद्र फडणवीसांसोबतची बैठक निष्फळ, तुतारी हाती घेण्याचं बड्या नेत्यानं केलं निश्चित, कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरु

Badlapur School Crime: कोर्टानं कालच अटकपूर्व जामीन फेटाळला अन् आज शाळेच्या दोन्ही फरार विश्वस्तांना झाली अटक

Mohammad Shami: हात जोडून विनंती करतो...! मोहम्मद शमी संतापला, 'त्या' वृत्ताचा केला इन्कार

Pune Crime: पुण्यात भयंकर प्रकार! बिल्डरची सोसायटीतल्या रहिवाशांना मारहाण, अंगावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न

Pune Crime : सोमवार पेठेतील शाळेतून दोन मुली बेपत्ता; समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT