How to improve mobile signal strength esakal
विज्ञान-तंत्र

Signal Problem: Call न लागण्याला प्रत्येकवेळी नेटवर्क गंडलेलं नसतंय? या गोष्टी चेक करा!

How to improve mobile signal strength: फोन लागत नसेल तर.. ही ट्रिक आजमावून पहा

Pooja Karande-Kadam

How to improve mobile signal strength: सहज एखाद्या व्यक्तीला फोन लावायचा असतो. किंवा घाईच्या वेळी लावायचा असो. कधी कधी फोन लागत नाही. असं का होतं ? तुमच्या फोनमध्ये नेटवर्कचा टॉवर तर फुल असतो. पण, तरीही कॉल लागत नाही. असं का बरं होतं.

हा नेटवर्कचा प्रॉब्लेम समजून तुम्ही विषय सोडून देता आणि दुसऱ्या कामात मग्न होता. हे नेहमीच होत नाही. कारण बहुतेक वेळा आपल्याच चुकीमुळे फोन कनेक्ट होऊ शकत नाही. नक्की काय गंडतंय हे माहिती नसल्याने 90 टक्के लोक तीच चूक पुन्हा करत राहतात.

त्यामुळेच आज अशाच काही ट्रिक्सबद्दल जाणून घेऊयात. ज्यामुळे कॉल न येण्याची समस्या दूर होईल. आणि त्या चुका तुम्ही पुन्हा करणार नाही.

फोन 5 मिनिटांसाठी बंद करा

अनेक वेळा आपण पाहतो की मोबाइल पूर्ण सिग्नल दाखवत आहे. पण कॉल येत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही एक सामान्य युक्ती अवलंबू शकता. तुम्ही 5 मिनिटांसाठी तुमचा फोन बंद करा आणि नंतर तो रीस्टार्ट करा. तुम्हाला दिसेल की तुमचा फोन सुरळीत सुरू झाला आहे.

डीएनडी स्टेटस तपासा

अनेक वेळा आपण घरी गेम खेळत असताना किंवा ऑफिसमधील महत्त्वाच्या मीटिंग दरम्यान मोबाइलच्या सेटिंगमध्ये जाऊन डीएनडी (Do Not Disturb) सुरू करतो. काहीवेळा ती गोष्ट चुकूनही होते. अशावेळी देखील तुमचा फोन इतर फोनसोबत कनेक्ट होणार नाही.

परिस्थितीत जेव्हा आपण एखाद्याला कॉल करतो तेव्हा आपला फोन कनेक्ट होऊ शकत नाही आणि आपला फोन किंवा सिम खराब झाल्याचे आपल्याला वाटते.

कस्टमर केअर

असं सगळं करूनही तुमचा फोन सतत प्रॉब्लेम दाखवत असेल. तुमचा फोन वापरता येत नसेल, तर तुम्ही कस्टमर केअरशी संपर्क साधून तुमची तक्रार नोंदवू शकता. ग्राहक सेवा तुमची तक्रार नोंदवेल आणि पुढील काही तासांत ते प्रॉब्लेम सॉल्व करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vote Jihad: भाजपच्या ‘वोट जिहाद’ प्रचाराला शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, भाजपला पुण्यात विशिष्ट समाज...

Beed VBA: बीडमधील अपक्ष उमेदवाराला काळं फासून मारहाण! वंचितच्या पदाधिकाऱ्यांचं कृत्य; भाजपला पाठिंबा दिल्यानं आक्रमक

हिवाळ्यात कंबरदुखीपासून आराम मिळवायचा आहे? उपाशी पोटी या पदार्थाचा करा सेवन

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

SCROLL FOR NEXT