लॅपटाॅप बॅटरीचं आयुष्य Esakal
विज्ञान-तंत्र

तासाभरातच उतरतेय Laptop Battery, मग या टिप्सच्या मदतीने लॅपटॉप होईल फास्ट

बॅकअपची साधारणपणे लॅपटॉपची बॅटरी Laptop Battery किंवा लॅपटॉप हा ४-५ तरी सुरू राहणं म्हणजेच ४-५ तासांचा बॅटरी बॅकअप Battery Backup असणं गरजेचं आहे

Kirti Wadkar

गेल्या काही वर्षांमध्ये कम्प्युटरची जागा लॅपटॉपने घेतली आहे. शिक्षणासाठी असो किंवा ऑफिसच्या कामांसाठी लॅपटॉपचा Laptop वापर वाढू लागला आहे. अशा लॅपटॉप जास्त तास वापरावा लागत असल्याने नवी समस्या पुढे येऊ लागली आहे. ती म्हणजे लॅपटॉपच्या बॅटरी. Smart Marthi Tips How to increase Battery life of your laptop

बॅकअपची साधारणपणे लॅपटॉपची बॅटरी Laptop Battery किंवा लॅपटॉप हा ४-५ तरी सुरू राहणं म्हणजेच ४-५ तासांचा बॅटरी बॅकअप Battery Backup असणं गरजेचं आहे. अशात केवळ तासाभरातच बॅटरी ड्रेन होत असल्याची अनेकांची तक्रार असते. 

मात्र रोजची कामं करत असताना तुम्ही थोडा वेळ काढून जर काही गोष्टींकडे लक्ष दिलं तर हा बॅटरी बॅकअप वाढवणं शक्य आहे. 

स्क्रिन ब्राइटनेस- लॅपटॉपच्या स्क्रिनचा ब्राइटनेस जास्त असल्यास लॅपटॉपची बॅटरी लवकर उतरते. यासाठी जर तुम्ही कमी उजेट असलेल्या खोलीत बसला असाल तर स्क्रिनचा ब्राइटनेस कमी करा. यामुळे बॅटरी जास्त काळ चालेल. 

किबोर्ड बॅकलाइट- अलिकडच्या नव्या लॅपटॉपमध्ये किबोर्ड बॅकलाइटचा पर्याय उपलब्ध असतो. यामुळे अंधारातही किबोर्ड वरील बटणं दिसण्यास सोयीचं ठरतं. मात्र गरज नसताना ही बॅकलाइट सुरू राहिल्यास बॅटरी लवकर तरते. यासाठी वेळीच किबोर्ड बॅकलाइट बंद करा. 

पाॅवर सेटिंग- जर तुम्ही सिनेमा पाहण्यासाठी किंवा गाणी ऐकण्यासाठी लॅपटॉपचा वापर करत असाल तर लॅपटॉपमध्ये असलेला पाॅवर सेव्हिंग मोड सुरू ठेवा. यामुळे बॅटरी सेव्ह होण्यास मदत होईल. लॅपटॉपवर हेवी मोडमधील काम नसल्यास पावर सेव्हिंग मोड ऑन ठेवा. 

हे देखिल वाचा-

नेटवर्क कनेक्शन बंद करा- अनेकदा लॅपटॉपमध्ये गरज नसतानाही ब्लूटूथ किंवा वायफाय सुरू राहतं. यामुळे बॅटरी लवकर ड्रेन होते. यासाठीच ते वेळोवेळी ऑफ करणं गरजेचं आहे. 

बॅकग्राउंड प्रोग्राम- लॅपटॉपवर काम करत असताना बॅकग्राउंडला अनेक प्रोग्राम सुरु असतात. यामुळे लॅपटॉपवर लोड येत असतो आणि बॅटरी लवकर उतरते. यासाठीच यातील तुम्ही वापरत नसलेले प्रोग्राम डिलीट करणं गरजेचं आहे. हे प्रोग्राम डिलीट केल्यास तुमच्या लॅपटॉपची बॅटरी जास्त काळ टिकेल . 

लॅपटॉपमधील नको असलेले प्रोग्राम किंवा अप्स डिलीट करण्यासाठी सर्च ऑप्शनमधून कंट्रोल पॅनलमध्ये जा. इथं programs and features हा पर्याय निवडा. इथं तुमच्य़ा लॅपटॉपमध्ये असलेले सर्व प्रोग्राम दिसतील. यातून तुम्ही जे प्रोग्राम वापरत नसाल ते डिलीट करा. 

इतर डिव्हाइस डिसकनेक्ट करा- अनेकदा लॅपटॉपला मोबाईल चार्जिंगला लावला जातो. तसचं स्पीकर किंवा कुलर असे कनेक्ट करण्यात आलेल्या इतर डिव्हाइसमुळे देखील बॅटरी लवकर उतरते. यासाठी कमीत कमी डिव्हाइस लॅपटॉपला कनेक्ट करा. ज्यामुळे बॅटरी बॅकअप वाढेल. 

बॅटरी लाइफ वाढवण्यासाठी इतर टिप्स

  • लॅपटॉप पूर्णच चार्ज झाल्यानंतरही चार्जिंग सुरू ठेवू नये. ओव्हर चार्जिंगमुळे Laptop batteryचे सेल्स डॅमेज होतात. यामुळे Laptop Battery Life कमी होतं. यामुळे बॅटरी १०० टक्के चार्ज झाल्यावर चार्जिंग बंद करावं.

  • एखाद्या सॉफ्टवेअरचं अपडेट वर्जन आल्यास Software update करावं. 

अशा काही गोष्टींची काळजी घेतल्यास लॅपटॉपचा बॅटरी बॅकअर वाढवणं शक्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT