Online Smartphone Shopping Tips : सणासुदीच्या सेलमध्ये ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर स्मार्टफोनवर आकर्षक सूट मिळत आहे. ग्राहक या ऑफरचा फायदा घेऊन आपल्या आवडत्या स्मार्टफोनची खरेदी कमी किमतीत करत आहेत. मात्र, काही ग्राहकांना या प्लॅटफॉर्मवरून वापरलेले किंवा रीफर्बिश्ड स्मार्टफोन मिळाल्याच्या तक्रारी आहेत.
अलीकडेच एका X (पूर्वी ट्विटर) वापरकर्त्याने फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलेला Google Pixel 8 स्मार्टफोन मिळाल्यानंतर तो स्क्रॅच झाल्याचे आढळून आले. फ्लिपकार्टवर 'ओपन बॉक्स डिलिव्हरी' सुविधा असल्यामुळे ग्राहकाने ओटीपी न देता लगेच फोन परत केला.
मात्र, जर तुम्हाला तुमच्या डिव्हाइसवर कोणतीही बाह्य नुकसान झाल्याचे दिसले नाहीत, तरी तो रीफर्बिश्ड आहे का याची तपासणी कशी कराल? यासाठी अनेक स्मार्टफोन कंपन्या त्यांच्या ग्राहकांना फोन न उघडता वॉरंटी तपासण्याची सुविधा देतात.
1. गुगलवर जाऊन तुम्ही घेतलेल्या ब्रँडसाठी वॉरंटी स्टेटस शोधा. उदाहरणार्थ, OnePlus स्मार्टफोनसाठी "OnePlus Warranty Check" असं सर्च करा.
2. वरच्या लिंकवर क्लिक करा आणि तुमच्या स्मार्टफोनचा सिरियल नंबर टाका.
3. जर तुमचा फोन अजून उघडला नसेल तर बॉक्सवर दिलेला सिरियल नंबर वापरा.
4. सिरियल नंबर टाकून वॉरंटी स्टेटस तपासा.
अशा प्रकारे, तुम्ही स्मार्टफोन नवा आहे की रीफर्बिश्ड याची खात्री करू शकता. अशा तक्रारी टाळण्यासाठी खरेदी करताना या तपासण्या करणं महत्त्वाचं आहे. ऑनलाइन पद्धतीने इलेक्ट्रोनिक वस्तु मागवल्यास कंपनी तुम्हाला ओपन बॉक्स डिलिव्हरीची सुविधा देते. त्यामध्ये वस्तु घेण्यापूर्वीच तुम्ही बॉक्स उघडून पाहू शकता. त्यामुळे मोबाइल खरेदी करताना सुद्धा अशीच काळजी घेऊन ओपन बॉक्स डिलिव्हरीचा पर्याय निवडा आणि तुमचा मोबाइल फोन नीट तपासून घ्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.