Smartphone headphone jack not working Have you tried this simple solution at home 
विज्ञान-तंत्र

स्मार्टफोनचा headphone jack काम करीत नाही? घरीच हे सोपे उपाय करून बघितले का?

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : बेसिक मोबाईल असो किंवा स्मार्टफोन आज प्रत्येकाच्या हातात दिसतो. मात्र, धावपळीच्या आजच्या जीवनात फोन हातात घेऊन बोलण्याचा कुणालाही वेळ नाही. त्यामुळे प्रत्येकजण हेडफोन वापरताना दिसून येतो. यातून मजूर वर्गही सुटलेला नाही. बोलता बोलता काम करण्याची सवय प्रत्येकाला झाली आहे. यामुळे वेळेची बचत होते. हेडफोन वापरण्याचे दुष्परिणामही आहेत. मात्र, याचा वापर काही कमी झालेला नाही. अती वापरामुळे स्मार्टफोनचा जॅक नेहमी खराब होत असतो. दुरुस्त करण्यासाठी मोबाईल रिपोरिंगच्या दुकानात धाव घ्यावी लागते. मात्र, आज आम्ही तुम्हला घरच्या घरी याची कशी दुरुस्ती करता येईल हे सांगणार आहोत.

आजच्या घडीला हेडफोन्स विविध परिस्थितीत उपयुक्त असे एक साधन झाले आहे. बाजारात इन-इयर आणि व्हॅक्युम हेडफोन, मॉनिटर्स, ओव्हर-इयर हेडफोन आणि यूएसबी पोर्टमध्ये हेडफोन उपलब्ध झाले आहेत. प्रत्येक प्रकारचे हेडफोनची स्वतःचे वैशिष्ट्य़ आहेत. आपण जेव्हा स्मार्टफोन वापरतो तेव्हा हेडफोन जॅक आणि इयरफोन देखील वापरतो.

गाणी ऐकायची असल्यास किंवा फोन करायचा असल्यास हेडफोन जॅक वापरला जातो. अनेकांच्या मोबाईलला तर ते लागूनच असते. यामुळे बऱ्याच वेळा हेडफोन जॅक खराब होतो. यामुळे अधिकचा त्रास सहन करावा लागतो. याची दुरुस्ती करण्यासाठी दुकाने फिरवाव्या लागतील. यात वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होत असतो. परंतु, तुम्हाला माहिती आहे का? आपण घरच्या घरी स्मार्टफोनचे हेडफोन जॅक दुरुस्त करू शकतो. घरी फोनचा खराब हेडफोन जॅक कसा दुरुस्त करावा याची पुढील प्रकार आहेत.


पहिली पद्धत

सर्वांत अगोदर स्मार्टफोनचा हेडफोन तुटलेला आहे की नाही हे तपासा. यासाठी कोणत्याही 3.5 मिमी जॅकमध्ये हेडफोन वापरून पहा. हेडफोन दुसऱ्या फोनमध्ये चालू असेल तर तुमच्या फोनमध्ये समस्या आहे, असे समजा. हेडफोन चालला नाही तर तो खराब झाला असे समजा.

दुसरी पद्धत

तुमचा स्मार्टफोन वायरलेस हेडफोन, स्पीकर्स किंवा ब्लूटूथद्वारे दुसऱ्या डिव्हाइसवर कनेक्ट केलेला असेल तर हेडफोन जॅक काम करणार नाही. जेव्हा तुम्ही हेडफोन स्मार्टफोनमध्ये प्लग करता तेव्हा स्मार्टफोनने ते त्वरित ओळखले पाहिजे. परंतु, हे करणे नेहमीच आवश्यक नसते. बऱ्याच वेळा असे घडते की फोनचे स्पीकर दुसऱ्या डिव्हाइससह ब्लूटूथशी कनेक्ट केलेले असते. हे आपल्या लक्षात राहत नाही. अशा परिस्थितीत आपण आपला फोन इतर कोणत्याही डिव्हाइससह ब्ल्यूटूथशी कनेक्ट केलेला आहे की नाही हे देखील तपासून पाहवे.

तिसरी पद्धत

कधीकधी हेडफोन जॅकमध्ये मोठ्या प्रमाणात घाण जमा होते. याची आपल्याला कल्पनाही नसते. आपण ते वेळोवेळी स्वच्छ केले पाहिजे. यासाठी कापसाचा वापर कारयला हवा. साफसफाई केल्यानंतर हेडफोन जॅक तपासल्यास हेडफोन जॅक कार्य करण्यास सुरुवात करेल. असे करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. थोडीही चूक झाल्यास हेडफोन जॅकची पीन खराब होऊ शकते.

चौथी पद्धत

बऱ्याचवेळा असे होते की हेडफोनचा जॅक चांगला असतो. स्मार्टफोनची एक छोटीशी सेटिंगमुळे आपल्याला या समस्येचा सामना करावा लागू शकतो. बऱ्याच वेळा स्मार्टफोनची सेटिंग बदलल्यामुळे ऑडिओ जॅक प्ले होत नाही. याचे निराकरण करण्यासाठी फोनची सेटिंग तपासणे गरजेचे असते. नंतर ऑडिओ उघडा आणि व्हॉल्यूम तपासा.

पाचवी पद्धत

वरीलपैकी सर्व पद्धत वापरल्यानंतरही तुमचा हेडफोन जॅक व्यवस्थित काम करत नसेल तर तुम्ही तुमचा फोन सेवा केंद्रात फोन दाखवा. तुमचा फोन वॉरंटीमध्ये असेल तर सेव केंद्रातच दाखवावा. येथे तुमचा फोन विनामूल्य दुरुस्ती करून मिळेल. परंतु, वॉरंटी संपली असेल तर पैसे द्यावे लागतील.

संकलन व संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सचिन पाटील 13327 मतांनी आघाडीवर

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT