Smartphone Launches in October 2024 esakal
विज्ञान-तंत्र

Smartphones in October : यंदाचा ऑक्टोबर मोबाईल प्रेमींसाठी खास; 25 हजारांच्या आत या नामवंत कंपन्यांचे ब्रँड 5G स्मार्टफोन,एकदा बघाच

Saisimran Ghashi

Smartphone Launches in October 2024 : ऑक्टोबर २०२४ मध्ये Amazon आणि Flipkart वर उपलब्ध ३०,००० रुपयांच्या आत मिळणारे सर्वोत्तम मोबाईल्सची यादी जाहीर झाली आहे. या यादीत Motorola Edge 50 Pro 5G, POCO F6 यासारख्या स्मार्टफोन्सचा समावेश आहे.

एआय-आधारित स्मार्टफोन्सच्या या युगात, आर्टिफिशियल इंटेलिजन्स केवळ एक ट्रेंड न राहता स्मार्टफोन्समधील एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य बनले आहे. कॅमेरा गुणवत्ता सुधारण्यापासून प्रोसेसिंग पॉवर ऑप्टिमाइझ करण्यापर्यंत, एआय आता मध्यम श्रेणीतील फोनमध्येही आवश्यक घटक आहे.

जर तुम्ही या सणासुदीच्या काळात उत्तम कॅमेरा आणि लाईव्ह AMOLED डिस्प्लेसह मोबाईल शोधत असाल, तर तुमची शोधयात्रा ऑक्टोबरमध्येच थांबेल. येथे ३०,००० रुपयांच्या आत उपलब्ध सर्वोत्तम स्मार्टफोन्सबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहे.

Motorola Edge 50 Pro 5G

Motorola Edge 50 Pro 5G हा फोन ऑक्टा-कोर प्रोसेसरसह येतो, ज्यात 2.63 GHz सिंगल कोर, 2.4 GHz ट्राय-कोर, आणि 1.8 GHz क्वाड-कोर कॉन्फिगरेशन आहे. Snapdragon 7 Gen 3 चिपसेटमुळे फोनला जलद कार्यक्षमता मिळते. या फोनमध्ये 8 GB RAM असून मल्टीटास्किंग सुलभ होते. 6.7 इंचाचा FHD+ P-OLED डिस्प्ले 144 Hz रिफ्रेश रेटसह उपलब्ध आहे, ज्यामुळे व्हिज्युअल अनुभव अधिक जीवंत वाटतो. कॅमेराच्या बाबतीत, 50 MP + 13 MP + 10 MP ट्रिपल कॅमेरा सेटअप बॅकवर असून, सेल्फीसाठी 50 MP चा फ्रंट कॅमेरा आहे. 4500 mAh बॅटरी असलेल्या या फोनमध्ये टर्बो पॉवर चार्जिंगची सुविधा आहे.

Nothing Phone 2a Plus

Nothing Phone 2a Plus मध्ये MediaTek Dimensity 7350 Pro चिपसेटसह 3 GHz ड्युअल-कोर आणि 2 GHz हेक्सा-कोर कॉन्फिगरेशन असलेला ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. 6.7 इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले 120 Hz रिफ्रेश रेटसह मिळतो. 50 MP + 50 MP ड्युअल कॅमेरा सेटअप आणि 50 MP चा फ्रंट कॅमेरा या फोनमध्ये आहे. फोन 5000 mAh बॅटरीसह येतो.

OnePlus Nord 4

OnePlus Nord 4 मध्ये Snapdragon 7 Plus Gen 3 चिपसेटसह 2.8 GHz सिंगल कोर, 2.6 GHz क्वाड-कोर, आणि 1.9 GHz ट्राय-कोर प्रोसेसर आहे. यामध्ये 8 GB RAM असून 6.64 इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले आहे, जो 120 Hz रिफ्रेश रेटसह येतो. फोनच्या मागील बाजूस 50 MP + 8 MP कॅमेरा सेटअप आणि 16 MP फ्रंट कॅमेरा आहे. 5500 mAh ची बॅटरी सुपर VOOC चार्जिंगला सपोर्ट करते.

Realme GT 6T

Realme GT 6T मध्ये Snapdragon 7 Plus Gen 3 चिपसेटसह 2.8 GHz सिंगल कोर, 2.6 GHz क्वाड-कोर आणि 1.9 GHz ट्राय-कोर प्रोसेसर आहे. 8 GB RAM आणि 6.78 इंचाचा FHD+ LTPO AMOLED डिस्प्ले 120 Hz रिफ्रेश रेटसह मिळतो. 50 MP + 8 MP ड्युअल कॅमेरा सेटअप आणि 32 MP चा फ्रंट कॅमेरा असलेला हा फोन 5500 mAh बॅटरीसह येतो.

POCO F6

POCO F6 मध्ये Snapdragon 8s Gen 3 चिपसेटसह ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. या फोनमध्ये 3 GHz सिंगल कोर, 2.8 GHz क्वाड-कोर, आणि 2 GHz ट्राय-कोर प्रोसेसरसह 8 GB RAM आहे. 6.67 इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले 120 Hz रिफ्रेश रेटसह मिळतो. 50 MP + 8 MP ड्युअल कॅमेरा सेटअप आणि 20 MP फ्रंट कॅमेरा यामध्ये आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकींची हत्या; सलमानशी मैत्री जीवावर बेतली? बिश्नोई गँगनं काटा काढला?

Baba Siddique Murder : जेव्हा सलमानने केलेली बाबा सिद्दीकी यांची आमदार बनण्यात मदत ; मोदींसोबतचा जुना व्हिडीओ पुन्हा चर्चेत

Raj Thackeray Dasara Melava 2024: पुढच्या महिन्यापर्यंतच पैसे येतील, नंतर येणार नाहीत"; 'लाडकी बहीण'बाबत राज ठाकरेंचा खळबळजनक दावा

नवाब मलिक यांच्या जावयाच्या निधनाचे वृत्त अफवा! महत्त्वाची अपडेट समोर...

Baba Siddiqui murde Pune connection: बाबा सिद्दीकींची हत्या करणाऱ्या तिसऱ्या आरोपीची ओळख पटली, पुण्यात होता कामाला...

SCROLL FOR NEXT