Smartphone Launch in September : सप्टेंबर महिना हा स्मार्टफोन चाहत्यांच्यासाठी खास आहे. या महिन्यात अनेक मोठ्या कंपन्या आपले नवीन स्मार्टफोन बाजारात आणत आहेत. तुम्ही अत्याधुनिक फीचर्स शोधत असाल, किफायतशीर पर्याय शोधत असाल किंवा मध्यम रेंजचा फोन हवा असाल, तर हे स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतात.
या महिन्यात कोण कोणते स्मार्टफोन लाँच होणार आहेत याची थोडक्यात माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
सगळीच वाट पाहात असलेली iPhone 16 सिरीज 9 सप्टेंबर रोजी लाँच होणार आहे. यात 4 वेगवेगळे मॉडेल्स असतील - iPhone 16, iPhone 16 Plus, iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max. या सर्व मॉडेल्समध्ये A18 चिपसेट असण्याची शक्यता आहे.
Vivo कंपनीने अजून T3 Ultra लाँच होणार असल्याची अधिकृत घोषणा केलेली नाही, पण चर्चा आहे की यात MediaTek Dimensity 9200+ प्रोसेसर आणि 3D कर्व्ड AMOLED डिस्प्ले असेल. याची किंमत साधारणपणे 30,000 रुपायांच्या आसपास असू शकते.
Infinix Hot 50 5G 5 सप्टेंबर रोजी भारतात लाँच होणार आहे. यात TUV SUD सर्टिफिकेशन असून 5 वर्षांपर्यंत स्मूथ परफॉर्मन्स मिळेल. असे बोलले जात आहे की यात MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर असेल आणि किंमत ₹10,000 च्या आसपास असेल.
Motorola कंपनी 9 सप्टेंबरला त्यांचा Motorola Razr 50 लाँच करणार आहे. यात 3.6 इंचचा बाहेरी डिस्प्ले आणि Gemini AI ची सपोर्ट असेल, जे तुमचा अनुभव आणखी चांगला करेल. यात MediaTek Dimensity 7300 Energy चिपसेट असण्याची शक्यता आहे आणि किंमत 50,000 रुपयांच्या आसपास असेल.
Samsung Galaxy S24 FE हा देखील या महिन्यात लाँच होणाऱ्या बहुचर्चित फोनपैकी एक आहे. यात त्याच्या आधीच्या मॉडेल्सच्या तुलनेत परफॉर्मन्स, कॅमेरा आणि बॅटरी लाईफमध्ये चांगले बदल असतील, ज्यामुळे तुम्हाला कमी किंमतीत फ्लॅगशिप फोनसारखा अनुभव मिळेल.
म्हणून, तुमच्या आवडीचा फोन या सप्टेंबरमध्ये येतोय. सप्टेंबर सुरू झाला आहे त्यामुळे प्रतीक्षा आहे या नव्या स्मार्टफोन लॉंचची.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.