Smartphone Tips : बऱ्याचदा असं होतं की, आत्ताच मोबाईलचा डेटा चालू केला नाही तोवर लगेच संपतो. आणि बरेचसे युजर्स सतत तक्रार करतात की त्यांचे इंटरनेट लवकर संपते. काहीजण म्हणतात की ते जास्त डेटा वापरत नाहीत, ऑन तरीही त्यांचा डेटा संपलेलाच असतो. मग आपण यासाठी मोबाइल किंवा टेलिकॉम कंपनीला यासाठी जबाबदार धरतो. पण तसं काही नसतं. मोबाईल डेटा लवकर संपुष्टात येण्यामागे अनेक कारणे असू शकतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमचा डेटा सेव्ह करू शकता. तुमच्या फोनमधील डेटा लवकर संपू नये असे तुम्हाला वाटत असेल तर या टिप्स फॉलो करा.
मोबाईल मधील या सेटिंग बदला...
ऑटो अपडेट मोड बंद करा : जर तुम्हाला मोबाईल डेटा लवकर संपू नये असे वाटत असेल तर हे टाळण्यासाठी तुम्ही ऑटो अपडेट फीचर बंद केले पाहिजे. जेव्हा तुमच्या फोनमध्ये वाय-फाय कनेक्ट केलेले असते किंवा मोबाइल डेटा चालू असतो, तेव्हा फोन आपोआप अॅप्स अपडेट करण्यास सुरुवात करतो, अशावेळी तुमचा मोबाइल डेटा लवकर संपतो.
नेव्हिगेशन अॅप बंद करा : तुम्ही तुमच्या फोनवर Google Map किंवा इतर कोणतीही सेवा वापरत असाल तर तुमचा मोबाइल डेटा लवकर संपू शकतो. तुमच्या फोनमध्ये, बॅकग्राउंडमध्ये गुगलच्या मॅप सेवेची नेव्हिगेशन सेवा सुरू असते. अशा परिस्थितीत डेटा लवकर संपतो. यासाठी नेव्हिगेशन अॅप्स विनाकारण सुरू ठेवू नका.
गेमिंग : जर तुम्ही तुमच्या फोनवर ऑनलाइन गेमिंग करत असाल तर तुमच्या फोनचा डेटा लवकर संपण्याची शक्यता आहे. अनेकदा, ऑनलाइन गेमिंगच्या काळात, अनेक जाहिराती येत राहतात ज्या तुमचा अधिक डेटा वापरतात. त्यामुळे फक्त ऑफलाइन गेम खेळणे आपल्यासाठी सर्वोत्तम आहे.
ई-कॉमर्स : बहुतेक युजर्स नेहमी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन गोष्टी शोधत असतात. यामुळे मोबाईल डेटा लवकर संपतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.