World Social Media Day 2024 esakal
विज्ञान-तंत्र

World Social Media Day 2024 : जागतिक सोशल मीडिया दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

World Social Media Day 2024 : आज जगभरात सोशल मीडिया दिवस साजरा करण्यात येत आहे.

सकाळ डिजिटल टीम

World Social Media Day 2024 : रोजच्या जीवनशैलीत सोशल मीडिया हा शब्द 100 पेक्षा अधिकवेळा कानावर पडतो. सोशल मीडियावर हे अन् सोशल मीडियावर ते. सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत आपण सगळेच सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असतो. परंतु, कधी विचार केलाय का सोशल मीडियाचा देखील दिवस असतो. त्याला देखील इतिहास आहे. (social media day why is celebrated know here history)

आज जगभरात सोशल मीडिया दिवस साजरा करण्यात येत आहे. आज 30 जून हा सोशल मीडिया दिवस म्हणून साजरा केला जातो. तर यानिमित्ताने हा दिवस साजरा करण्यामागचा इतिहास नेमका आहे तरी काय? हे जाणून घेऊ.

नेमका इतिहास आहे तरी काय?

आजच्या दिवशीच म्हणजेच 30 जून 2010 रोजी सोशल मीडियाची सुरुवात झाली. या दिवशी Mashable ने सोशल मीडिया दिनाची सुरूवात केली अन् आज जगातील प्रत्येकजण सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करत आहे.

पूर्वी सोशल मीडियाचा लोकांवर फारसा प्रभाव नव्हता. त्यामुळे सोशल मीडियाचा प्रभाव, जागतिक संवाद आणि त्याची भूमिका अधोरेखित करण्यासाठी जागतिक सोशल मीडिया डे साजरा करण्यास मॅशेबल या वेबसाईटने सुरुवात केली होती.

पहिले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कोणते?

पहिले सोशल मीडिया प्लॅटफॉर्मबद्दल बोलायचे झाल्यास सिक्सडिग्री हे जगभरात लाँच करण्यात आलेले पहिले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म होते. जे 1997 मध्ये लाँच करण्यात आले होते. या प्लॅटफार्मची स्थापना अँड्र्यू वेनरिच यांनी केली होती. 2001 मध्ये, या सोशल मीडिया प्लॅटफार्मचे 1 दशलक्षाहून अधिक वापरकर्ते होते. ऐवढ्या मोठ्या प्रमाणात वापरकर्ते असताना देखील हे प्लॅटफार्म बंद करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: धक्कादायक! विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून तडीपार गुंडांनी हातात कोयते घेऊन माजवली दहशत

Exit Poll : नवा एक्झिट पोल जाहीर, 175 जागांसह नवे सरकार, मुख्यमंत्री कोण होणार ?

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Aaryavir Sehwag Double Hundred : वीरूच्या लेकाची दमदार खेळी! कुटल्या ३४ चौकार, २ षटकारांसह नाबाद २०० धावा

Gautam Adani: अदानी समुहाला आणखी एक मोठा धक्का! केनिया सरकारने रद्द केले सर्व करार

SCROLL FOR NEXT