Big Solar Storms coming on earth esakal
विज्ञान-तंत्र

बंद होणार रेडिओ, GPS,सॅटेलाईट ...पृथ्वीवर येतंय 'महासंकट'!

पृथ्वीवर आज मंगळ भारी पडू शकतो. आज १९ जुलैला एक मोठं संकट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

पृथ्वीवर आज मंगळ भारी पडू शकतो. आज १९ जुलैला एक मोठं संकट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्याचा प्रभाव थेट पृथ्वीवर होणार असल्याची शंका व्यक्त केली जातेय. अंतराळ हवामानशास्त्रज्ञ डॉ. तमिथा स्कॉव यांच्या मते, सूर्यापासून सापासारखी एक फ्लेअर पृथ्वीवर आदळणार असल्याचं सांगितलं जातंय. ज्यामुळे जीपीएस, टीव्ही आणि रेडिओ सारखी माध्यमे बंद पडण्याची शक्यता आहे. (Big Solar Storms coming on earth)

सोलर फ्लेयरमुळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आणि उष्णता खुप वाढते. या उष्णतेमुळे पृथ्वीवरची उष्णता वाढत नसली तरी इलेक्ट्रो मॅग्नेटिक रेडिएशनमुळे पृथ्वीच्या मॅग्नेटिक फिल्डवर त्याचा परिणाम होऊ शकतो आणि पृथ्वीपर्यंत पोहोचणारे सिग्नल्स बंद पडू शकतात. शास्त्रज्ञांच्या मते, गेल्या काही दिवसांत सूर्य जास्त तेज दिसतोय. त्यामुळे जिओमॅग्नेटिक (Geomagnetic storms)वादळ पृथ्वीवर येत आहेत.ज्याला वैज्ञानिक भाषेत 'एम क्लास' (M class) आणि 'एक्स क्लास' (X class) फ्लेअर असं म्हणतात.

लाखो किमी वेगात येतं सोलर वादळ

सूर्यावर पडलेल्या डागाने कोरोनल मास इजेक्शन (Coronal Mass Ejection- CME)होतं.हा एकप्रकारचा सूर्य विस्फोटच असतो. ज्यामुळे अंतराळात कितीतरी लाख किमी प्रती तासाने एक अरब टन चार्ज पार्टिकल पसरतात. हे चार्ज पार्टिकल जेव्हा पृथ्वीवर आदळतात तेव्हा अनेक सॅटेलाईट नेटवर्क,जीपीएस सिस्टिम,सॅटेलाईट टीव्हि आणि रेडिओ माध्यमे बंद पडण्याची तीव्र शक्यता असते.

काय असतात सूर्यावरचे डाग..कसे बनतात ते ?

जेव्हा सूर्यच्या कोणत्या एका भागात दुसऱ्या भागाच्या तुलनेत जास्त उष्णता असते तेव्हा त्यावर सूर्यावर डाग पडतात. हे डाग लहान आणि काळ्या स्वरूपाचे दिसतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT