पृथ्वीवर आज एक मोठं सौर वादळ येण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील राष्ट्रीय हवामान सेवेच्या स्पेस वेदर प्रेडिक्शन विभागाने (SWPC) याबाबत इशारा दिला आहे. आज (3 सप्टेंबर) पृथ्वीवर G1 लेव्हलचे जिओमॅगनेटिक वादळ येण्याची शक्यता यात वर्तवण्यात आली आहे.
1 ते 5 या स्तरावर हे सर्वात कमी धोकादायक वादळ असणार आहे. मात्र, यामुळे जगभरात काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित होऊ शकतो. तसंच, यामुळे नेव्हिगेशन आणि कम्युनिकेशन सेवांमध्ये देखील अडथळा येऊ शकतो. स्पेसवेदर या वेबसाईटने याबाबत माहिती दिली आहे.
सौर वादळांच्या स्वरुपानुसार त्यांना G1 ते G5 असे क्रमांक दिले जातात. यामध्ये G1 हे सर्वात हलक्या स्वरुपाचं वादळ असतं, तर G5 सर्वात शक्तिशाली. सौरवादळांचा थेट परिणाम पृथ्वीभोवती फिरणाऱ्या कृत्रिम उपग्रहांवर होतो. यामुळे मोबाईल नेटवर्क, GPS आणि इंटरनेट अशा सेवा खंडित होण्याची शक्यता असते.
अधिक शक्तिशाली सौर वादळाचा पृथ्वीवर असणाऱ्या उपकरणांनाही फटका बसतो. पृथ्वीवरील पॉवर ग्रिड आणि संवेदनशील इलेक्ट्रिक उपकरणांचं यामुळे मोठं नुकसान होतं.
सूर्याच्या पृष्ठभागावर सतत मोठे-मोठे स्फोट होत असतात. अशा वेळी या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात सोलर फ्लेअर्स, यूव्ही किरणं, क्ष किरणं आणि गामा रेज बाहेर पडतात.
आज येणारं सौर वादळ हे अगदीच कमी क्षमतेचं असल्यामुळे त्याचा आदित्य एल-1 उपग्रहाला कोणताही धोका नाही. खरंतर आदित्य उपग्रह हा सूर्याचाच अभ्यास करण्यासाठी बनवण्यात आलं असल्यामुळे, यात सौर वादळांपासून सुरक्षेसाठी योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. शिवाय, हा उपग्रह अजूनही पृथ्वीच्या कक्षेतच आहे. त्यामुळे आज येणाऱ्या सौर वादळामुळे आदित्यला कोणताही धोका नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.