WhatsApp Account Blocked eSakal
विज्ञान-तंत्र

WhatsApp Account Blocked : 'या' कारणांमुळे ब्लॉक होऊ शकतं तुमचं व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट; सोनू सूदलाही बसलाय फटका!

खरंतर अकाउंट बंद होण्यासाठी भरपूर गोष्टी कारणीभूत ठरू शकतात. यापैकी एक चूक केल्याने देखील तुमचं व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट बॅन केलं जाऊ शकतं. कोणत्या आहेत या गोष्टी? जाणून घेऊयात.

Sudesh

Sonu Sood WhatsApp Blocked : अभिनेता सोनू सूदचं व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट ब्लॉक झालं आहे. याबाबत त्याने एक्स पोस्ट करत कंपनीकडे तक्रार देखील केली आहे. कोरोना काळात परराज्यातील मजूरांना आपल्या घरी पोहोचवण्यासाठी सोनू सूदने मदत केली होती. त्यानंतर देखील कित्येक वेळा त्याने गरजवंतांची मदत केली आहे. मदतीसाठी कित्येक लोक आपल्याला संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत; मात्र व्हॉट्सअ‍ॅप बंद असल्यामुळे त्यांची अडचण होत असल्याचं त्याने एका पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सोनू सूदच्या तक्रारीवर अद्याप व्हॉट्सअ‍ॅपने प्रतिक्रिया दिलेली नाही. त्याचं अकाउंट कशामुळे ब्लॉक झालं याबाबत देखील अद्याप स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. मात्र, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे आपलं व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट बंद होऊ शकतं? खरंतर यासाठी भरपूर गोष्टी कारणीभूत ठरू शकतात. यापैकी एक चूक केल्याने देखील तुमचं व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट बॅन केलं जाऊ शकतं. कोणत्या आहेत या गोष्टी? जाणून घेऊयात. (WhatsApp Account Banned)

या चुकांमुळे तुमचं व्हॉट्सअ‍ॅप बंद होऊ शकतं -

थर्ड पार्टी अ‍ॅप्स - तुम्ही जर व्हॉट्सअ‍ॅपच्या अधिकृत अ‍ॅप ऐवजी GB WhatsApp, WhatsApp Plus किंवा WhatsApp Delta अशा अ‍ॅप्सचा वापर करत असाल, तर तुमचं अकाउंट बॅन होऊ शकतं.

फेक अकाउंट - तुम्ही जर दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या डीटेल्स वापरून व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट उघडलं असेल, तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. या प्रकाराला आयडेंटिटी थेफ्ट म्हणून व्हॉट्सअ‍ॅप तुमचं अकाउंट ब्लॉक करेल.

रिपोर्ट - तुम्ही जर एखाद्या अनोळखी व्यक्तीला विनाकारण वारंवार मेसेज करत असाल, तर त्वरीत थांबवा. त्या व्यक्तीने तुमचा नंबर रिपोर्ट केला, आणि तुमची चूक सिद्ध झाली तर तुमचं अकाउंट ब्लॉक होऊ शकतं.

अश्लील/स्पॅम मेसेज - जर तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवरुन कोणाला धमकी देत असाल, अश्लील मेसेज किंवा कंटेंट पाठवत असाल, तर तुमचा नंबर कंपनी कायमचा बंद करू शकते. म्हणजेच, त्या नंबरवरुन तुम्ही पुन्हा व्हॉट्सअ‍ॅप वापरू शकणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT