Sony BRAVIA X80L esakal
विज्ञान-तंत्र

Sony BRAVIA X80L : Sony ने लॉन्च केले नवीन स्मार्ट TV, गेमिंगसाठी मिळणार PS5 सपोर्ट

सकाळ डिजिटल टीम

Sony BRAVIA X80L : जर तुम्ही जुना टीव्ही सोडून नवीन टीव्ही घेण्याचा विचार करत असाल, तर सोनीने आपली नवीन Sony BRAVIA X80L सिरीज लॉन्च केली आहे. याअंतर्गत 43 इंच, 50 इंच आणि 85 इंच अशा तीन स्क्रीन टाईप मॉडेल लॉन्च करण्यात आलेत. हे नवीन टीव्ही मॉडेल तुम्हाला कोणते नवीन फीचर्स देणार ते बघुया.

सोनी स्मार्ट टीव्ही मॉडेल्सच्या किंमती

सोनीने आपल्या नवीन सिरीज अंतर्गत एकाच वेळी तीन मॉडेल्स लॉन्च केलेत. 43 इंचाचं टीव्ही मॉडेल खरेदी करण्यासाठी 99,900 रुपये, 50-इंच मॉडेलसाठी 1,14,900 रुपये खर्च करावे लागतील, पण कंपनीने या सिरीज मधील 85-इंचाच्या मॉडेलची किंमत जाहीर केलेली नाही.

19 एप्रिल 2023 पासून म्हणजेच आजपासून 43-इंच आणि 50-इंच सोनी स्मार्ट टीव्ही मॉडेल्सची विक्री सुरू होईल आणि तुम्ही हे मॉडेल्स सोनी सेंटर, ई-कॉमर्स साइटवरून खरेदी करू शकाल.

या सर्व टीव्ही मॉडेल्स मध्ये 3,840 x 2,160 पिक्सेल, डॉल्बी व्हिजन, HDR10 च्या स्क्रीन रिझोल्यूशनला सपोर्ट करतात. याशिवाय, या नवीन मॉडेल्समध्ये अॅम्बियंट लाइट सेन्सर देण्यात आला आहे, जो खोलीच्या प्रकाशाच्या स्थितीनुसार टीव्हीच्या स्क्रीन ब्राइटनेसला ऑप्टिमाइझ करण्याचं काम करतो.

ऑडिओबद्दल सांगायचं झाल्यास, टीव्हीमध्ये 20 W X स्टेबल स्पीकर देण्यात आलेत. यात डीप बास आणि क्लिअर ऑडिओ मिळतो. डीपनेस आणि क्लियारीटीसाठी तुम्हाला टीव्हीमध्ये डॉल्बी अॅटमॉस सपोर्ट देखील मिळेल.

गेमिंग प्रेमींना सोनी ब्रँडच्या या नवीन टीव्ही मॉडेल्समध्ये PS5 देखील पहायला मिळेल. याशिवाय, सोनी स्मार्ट एलईडी टीव्ही मॉडेल्समध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ, 4.2 एचआयडी, ड्युअल बँड वाय-फाय, चार एचडीएमआय पोर्ट, दोन यूएसबी पोर्ट आणि 3.5 मिमी ऑडिओ जॅक सारखे फीचर्स देण्यात आलेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT