बऱ्याच दिवसांनंतर सोनीने आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीच्या या नवीन हँडसेटचे नाव Sony Xperia 5 IV असे असून हा स्मार्टफोन दमदार डिस्प्ले, वायरलेस चार्जिंग आणि ट्रिपल कॅमेरा सेटअपने सुसज्ज आहे. कंपनीने नुकताच हा फोन युरोप आणि यूएसमध्ये लॉन्च केला आहे. युरोपमध्ये त्याची किंमत 1049 युरो (सुमारे 83,700 रुपये) आणि यूएसमध्ये ती $ 999 (सुमारे 80 हजार रुपये) आहे. कंपनी हा फोन भारतात कधी लॉन्च करेल याबद्दल अद्याप माहिती देण्यात आलेली नाहीये. चला या फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊयात..
Sony Xperia 5 IV चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
फोनमध्ये कंपनी 2520x1080 पिक्सेल रिझोल्युशनसह 6.1-इंचाचा फुल HD + OLED डिस्प्ले देत आहे. हा डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेटसह येतो. कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस प्रोटेक्शनसह येत असलेल्या या फोनला IP68 वॉटर आणि डस्ट रेसिस्टंट रेटिंग देण्यात आली आहे.हा लेटेस्ट सोनी फोन 8 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेजने सुसज्ज आहे. प्रोसेसर म्हणून कंपनी यात Snapdragon 8 Gen 1 चिपसेट देत आहे.
फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे देण्यात आले आहेत. फोनमध्ये दिलेले हे तीन कॅमेरे 12 मेगापिक्सलचे आहेत. त्याच वेळी, कंपनी सेल्फीसाठी या फोनमध्ये 12-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत आहे. फोनमध्ये पॉवरसाठी 5000mAh बॅटरी दिली आहे .ही बॅटरी 30K फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
याशिवाय कंपनी फोनमध्ये Qi वायरलेस चार्जिंगची सुविधाही देत आहे. OS बद्दल बोलायचे झाले तर फोन Android 12 वर काम करतो. तसेच फोनमध्ये Dolby Atmos सह ड्युअल स्टीरिओ स्पीकर देण्यात आले आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये 3.5mm हेडफोन जॅक आणि वाय-फाय व्यतिरिक्त, फोनमध्ये सर्व स्टॅंडर्स ऑप्शन्स दिले गेले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.