IDTR Trains ISRO Drivers in Road Safety and Accident Prevention esakal
विज्ञान-तंत्र

ISRO Drivers Training : इस्रोकडून कार ड्रायवर्सना पुण्यात स्पेशल ट्रेनिंग; नेमकं कारण काय?

Skill Development Training Program for ISRO Drivers at Pune’s IDTR : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वतीने ‘आयडीटीआर- सीआयआरटी’ हा पुण्यात (पिंपरी - चिंचवड क्षेत्र) सुरू झालेला देशातील पहिला पायलट प्रोजेक्ट आहे. येथे चालकांचे वाहन चालविण्याचे कौशल्य विकसित केले जातात.

Saisimran Ghashi

IDTR Trains ISRO Drivers in Road Safety and Accident Prevention : ‘इस्रो’च्या वैज्ञानिकांची व उपग्रहासंदर्भात मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांचे कौशल्य विकसित करण्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग ॲण्ड रिसर्च (आयडीटीआर) संस्थेच्या वतीने ‘इस्रो’च्या वाहनचालकांना विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. यात केवळ रस्ते वाहतुकीचे नियमच नाही, तर आपल्या वाहनांचा अपघात होऊ न देणे व समोरच्या वाहनचालकांकडून अपघाताचा प्रयत्न झाल्यास त्या अपघातातून स्वतःचे वाहन वाचविणे, बदलत्या नैसर्गिक परिस्थितीनुसार वाहन चालविणे, अशा विविध स्तरावरील प्रशिक्षण चालकांना दिले जात आहे. आतापर्यंत सुमारे ३०० चालकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वतीने ‘आयडीटीआर- सीआयआरटी’ हा पुण्यात (पिंपरी - चिंचवड क्षेत्र) सुरू झालेला देशातील पहिला पायलट प्रोजेक्ट आहे. येथे चालकांचे वाहन चालविण्याचे कौशल्य विकसित केले जातात. सध्या येथे ‘इस्रो’च्या चालकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.

कसे आहे प्रशिक्षण?

  • बदललेले रस्ते वाहतुकीचे नियम याची माहिती

  • वाहन चालविताना घ्यावयाची काळजी

  • वाहन चालविताना इंधनांची बचत

  • अपघात झाल्यास रुग्णवाहिका येईपर्यंत प्राथमिक उपचारांची माहिती

  • वाहनाला आग लागल्यास त्यावर नियंत्रण मिळवणे.

  • वाहतुकीचे चिन्ह, त्याच्या अर्थानुसार वाहन कसे चालवायचे.

  • वळणावर घ्यावयाची काळजी

  • वाहन चालविताना चालकांना वाहनांची न दिसणारी बाजू, अशा स्थितीत सुरक्षित वाहन कसे चालवावे.

अपघातांची केस स्टडी

  • चालकांना रस्ता कोणत्या दर्जाचा आहे, हे सांगितले जाते.

  • वाहनाचे प्रकार, बी एस ६ म्हणजे काय हे कळण्यासाठी प्रत्यक्षात वाहनांची निर्मिती होणाऱ्या ठिकाणी नेले जाते.

  • गंभीर अपघातांची केस स्टडी अभ्यासाला दिली जाते. अपघात का झाला, तो कसा टाळता येऊ शकला असता, याची प्रात्यक्षिकांसह माहिती दिली जाते.

  • रस्त्याचा प्रकार कसा ओळखायचा, दोन वाहनांत किती अंतर पाहिजे व सिग्नलवर किती अंतर पाहिजे.

प्रशिक्षण कालावधी ३० दिवसांचा

‘आयडीटीआर’ संस्थेत ३० दिवसांचा प्रशिक्षण कालावधी आहे. यात स्टिम्युलेटरसह प्रत्यक्षात वाहन चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. १५ वाहने उपलब्ध. यात टेलर ते दुचाकीचा समावेश आहे.

सुरक्षित रस्ते वाहतुकीसाठी चालकांचे कौशल्य विकसित करणे गरजेचे आहे. त्यासाठी चालकांना ठरावीक काळानंतर प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. ‘आयडीटीआर’मध्ये याबाबत प्रशिक्षण दिले जाते. ‘इस्रो’च्या वाहनचालकांनादेखील प्रशिक्षण दिले आहे.

— संजय ससाणे, प्राचार्य, ‘आयडीटीआर’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad Election : पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब पाटील पराभूत कसे पराभूत झाले ? आघाडीत बिघाडीचा दोघांनाही बसला फटका

Viral Video : नवरा बनला सुपरमॅन; चोराला पकडण्यासाठी फिल्मी स्टाईलने टॅम्पोला लटकला!

Latest Marathi News Updates : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या रणनीतीसाठी काँग्रेसची आज दिल्लीत महत्त्वाची बैठक

Krishna Khopde : पूर्व नागपुरात ‘कृष्ण कमळ’ ला तोड सापडेना, सलग चौथ्यांदा विजय : कॉंग्रेसनंतर राष्ट्रवादीही हतबल

Rahul Kul: आमदार राहुल कुल यांची अनोखी हॅटट्रीक; मंत्रीपदाचा वनवास कधी संपणार?

SCROLL FOR NEXT