Star Health insurance data breach esakal
विज्ञान-तंत्र

Health Insurance Data Leak : देशातील नामवंत हेल्थ इन्शुरन्स कंपनीच्या 3 कोटींहून अधिक ग्राहकांचा डेटा लीक; मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यावर गंभीर आरोप

Star Health insurance data breach : भारतातील अग्रगण्य आरोग्य विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या स्टार हेल्थ इन्शुरन्सच्या ३.१ कोटी ग्राहकांचा वैयक्तिक डेटा मोठ्या प्रमाणावर लीक झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Saisimran Ghashi

Star Health insurance data leak : भारतातील अग्रगण्य आरोग्य विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या स्टार हेल्थ इन्शुरन्सच्या ३.१ कोटी ग्राहकांचा वैयक्तिक डेटा मोठ्या प्रमाणावर लीक झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या मोठ्या सायबर हल्ल्यामुळे ग्राहकांचे नावे, पॅन क्रमांक, मोबाईल क्रमांक, ईमेल पत्ते, पॉलिसी तपशील, जन्मतारीख आणि गोपनीय वैद्यकीय नोंदी यांसारखा संवेदनशील डेटा उघड झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा डेटा ऑनलाइन विक्रीसाठी देखील उपलब्ध असल्याचे समोर आले आहे,असे वृत्त इंडिया टूडेने दिले आहे.

स्टार हेल्थ इन्शुरन्सने या सायबर हल्ल्याची कबुली दिली असून कंपनीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हॅकरने जवळपास ७.२४ टेराबाईट्स इतका प्रचंड डेटा चोरून त्याची किंमत १.५० लाख अमेरिकन डॉलर्स इतकी लावली आहे. इतकेच नव्हे, तर १ लाख ग्राहकांचा डेटा १० हजार डॉलर्सला विक्रीसाठी ठेवण्यात आला असल्याची माहिती देखील समोर येत आहे.

या गंभीर प्रकरणात आणखी एक मोठा आरोप समोर आला आहे की, कंपनीच्या मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (सीआयएसओ) अमरजीत खनुजा यांनीच हा डेटा हॅक करण्यास मदत केली.

हा आरोप एका व्हिसलब्लोअरने केला असून, खनुजाने Tox नावाच्या एन्क्रिप्टेड अ‍ॅपद्वारे हॅकरशी संपर्क साधला आणि क्रिप्टोकरन्सीच्या बदल्यात लॉगिन क्रेडेन्शियल्ससह एपीआय तपशील पुरवले असल्याचा आरोप आहे.

कंपनीने मात्र या सर्व आरोपांचे खंडन केले आहे आणि हा हल्ला जाणूनबुजून केलेला एक घातपात आहे असे म्हटले आहे. कंपनीच्या अधिकृत निवेदनानुसार, ग्राहकांच्या डेटाची सुरक्षितता महत्त्वाची असून, या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी सायबर सुरक्षा तज्ञांची मदत घेतली जात आहे. ग्राहकांना आश्वासन देण्यात आले आहे की, कंपनीच्या सेवा सुरळीत सुरू आहेत.

स्टार हेल्थ इन्शुरन्सने या हल्ल्याच्या चौकशीसाठी फॉरेन्सिक तपास सुरू केला आहे. त्याचबरोबर कंपनीने हॅकरविरोधात आणि टेलिग्रामवर ज्या माध्यमातून हा डेटा शेअर झाल्याचा आरोप आहे, त्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कंपनी सरकारी आणि नियामक यंत्रणांशी समन्वय साधून या हल्ल्याचे नुकसान कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: धक्कादायक! विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून तडीपार गुंडांनी हातात कोयते घेऊन माजवली दहशत

Exit Poll : नवा एक्झिट पोल जाहीर, 175 जागांसह नवे सरकार, मुख्यमंत्री कोण होणार ?

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Aaryavir Sehwag Double Hundred : वीरूच्या लेकाची दमदार खेळी! कुटल्या ३४ चौकार, २ षटकारांसह नाबाद २०० धावा

Gautam Adani: अदानी समुहाला आणखी एक मोठा धक्का! केनिया सरकारने रद्द केले सर्व करार

SCROLL FOR NEXT