Startups contribution to research :Dr.Jitendra Singh esakal
विज्ञान-तंत्र

Indian Startups : स्टार्टअपबद्दल डॉ. जितेंद्र सिंह यांचं मोठं विधान; ‘अध्यात्म आणि विज्ञान’ विषयावरील परिसंवादात मांडले मत

Startup Role in Research Ranking : संशोधन क्रमवारीत २०१४ मध्ये ८१व्या क्रमांकावर असलेला भारत २०२२ मध्ये ४० व्या स्थानावर पोहोचला असून, त्यामध्ये स्टार्टअपचा मोलाचा वाटा आहे.

सकाळ डिजिटल टीम

Pune : कोरोनावर जगभर झालेल्या उपचार पद्धतीमध्ये आयुर्वेदिक औषधांचा प्रामुख्याने वापर केला गेला. जागतिक पातळीवरील विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचा सहभाग पहिल्या श्रेणीतील राहिला आहे. संशोधन क्रमवारीत २०१४ मध्ये ८१व्या क्रमांकावर असलेला भारत २०२२ मध्ये ४० व्या स्थानावर पोचला असून, त्यामध्ये स्टार्टअपचा मोलाचा वाटा आहे, असे मत केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी पुण्यात व्यक्त केले.

विज्ञान भारतीच्या सहाव्या राष्ट्रीय अधिवेशनात ‘अध्यात्म आणि विज्ञान’ या विषयावरील परिसंवादात डॉ. सिंह यांनी आपले विचार मांडले. लोणी काळभोर येथील एमआयटी-एडीटी विद्यापीठाच्या प्रांगणातील विश्वशांती सभागृहात झालेल्या परिसंवादावेळी रामकृष्ण मठ पुणेचे अध्यक्ष स्वामी श्रीकांतानंद, माजी संरक्षण सचिव डॉ. सतीश रेड्डी, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ दा. कराड, विज्ञान भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शेखर मांडे आदी उपस्थित होते. या अधिवेशनात देशभरातून १५०० प्रतिनिधी उपस्थित आहेत.

विज्ञानाने प्रगती होत असली तरी ती स्वार्थीपणाकडे घेऊन जाणारी आहे. त्यामुळे देशाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जात असतानाच संस्कार, संस्कृतीचे रक्षण होणे गरजेचे आहे. त्यामुळे विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालून पुढे जायला हवे, असे मत स्वामी श्रीकांतानंद यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन विवेकानंद पै यांनी केले. मयांक बडजात्या यांनी आभार मानले.

संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भरता वाढली

पूर्वी भारत संरक्षण क्षेत्रासाठी लागणारी उपकरणे, शस्त्रे आयात करत असे. गेल्या काही वर्षांत भारतात मोठ्या प्रमाणावर संशोधन झाले असून आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया यांसारख्या उपक्रमामुळे आज आपण मिसाईल, शस्त्रे निर्मितीत स्वयंपूर्ण होऊन निर्यातही करू लागलो आहोत. अमेरिका, रशिया आणि चीननंतर प्रगत तंत्रज्ञान असलेला देश म्हणून भारताची ओळख झाली आहे. लढाऊ विमानांची निर्मिती आपण करत आहोत. संरक्षण क्षेत्रात आपण अधिक सक्षम व आत्मनिर्भर झालो आहोत, अशी माहिती डॉ. सतीश रेड्डी यांनी दिली.

समुद्रमंथनासाठी भारत सज्ज

भारताला ७५० किलोमीटर लांबीचा समृद्ध सागर किनारा लाभला असून आधुनिक युगातील समुद्रमंथनाचे आव्हान स्वीकारण्यास आता आपण सज्ज झालो आहोत, असा विश्वास डॉ. जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, ‘‘समुद्री संशोधनातून खनिज, धातू आणि जैववैविध्यामध्ये, तसेच माशांच्या निर्यातीत भारत अग्रक्रमावर पोचेल. गेल्या १० वर्षांत देशात विज्ञानप्रसारासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. भविष्यात भारताच्या या प्रगतीचा आलेख असाच चढता राहण्यासाठी खासगी आणि सरकारी क्षेत्रातील उद्योगांचे एकत्रीकरण, प्राचीन सामग्रीचा वापर आणि पारंपरिक ज्ञानाचा आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोनातून वापर या तीन गोष्टी अत्यावश्यक आहेत.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: धक्कादायक! विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून तडीपार गुंडांनी हातात कोयते घेऊन माजवली दहशत

Exit Poll : नवा एक्झिट पोल जाहीर, 175 जागांसह नवे सरकार, मुख्यमंत्री कोण होणार ?

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Aaryavir Sehwag Double Hundred : वीरूच्या लेकाची दमदार खेळी! कुटल्या ३४ चौकार, २ षटकारांसह नाबाद २०० धावा

Gautam Adani: अदानी समुहाला आणखी एक मोठा धक्का! केनिया सरकारने रद्द केले सर्व करार

SCROLL FOR NEXT