Cosmetic Surgery Craze eSakal
विज्ञान-तंत्र

Cosmetic Surgery : सर्वसामान्यांमध्ये का वाढतेय प्लॅस्टिक सर्जरीची क्रेझ? मोबाईलशी आहे थेट कनेक्शन, वाचा रिपोर्ट

Social Media Research : या संशोधनासाठी काही नागरिकांना त्यांचा सोशल मीडिया (Social Media) वापर आणि कॉस्मेटिक प्रोसीजर पार पाडण्याची त्यांची इच्छा याबाबत प्रश्न विचारण्यात आले.

Sudesh

Social Media increases desire of Cosmetic Surgery : सोशल मीडिया, फोटो एडिटिंग अ‍ॅप्स यांच्या अति वापरामुळे लोकांमध्ये कॉस्मेटिक सर्जरी करण्याची इच्छा वाढत असल्याची माहिती एका रिसर्चमध्ये समोर आली आहे. जर्नल ऑफ क्लिनिकल अँड अ‍ॅस्थेटिक डर्मेटॉलॉजी या नियतकालिकामध्ये याबाबत अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.

"सोशल मीडियावर सातत्याने सेलिब्रिटी, इन्फ्लुएन्सर्स यांचे व्हिडिओ पाहून, किंवा मग प्लास्टिक सर्जरीबाबत आणि इतर कॉस्मेटिक सर्जरीबाबत माहिती देणारे व्हिडिओ पाहून सामान्य लोकांमध्ये या सर्जरींची इच्छा मोठ्या प्रमाणात वाढते," असं या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. (Social Media Influence)

असं पार पडलं संशोधन

या संशोधनासाठी काही नागरिकांना त्यांचा सोशल मीडिया (Social Media) वापर आणि कॉस्मेटिक प्रोसीजर पार पाडण्याची त्यांची इच्छा याबाबत प्रश्न विचारण्यात आले. यातून असं सिद्ध झालं, की जेवढे जास्त तास एखादी व्यक्ती सोशल मीडियावर वेळ व्यतीत करते, तेवढी तिची सर्जरीची (Cosmetic Procedure) इच्छा अधिक होते.

फोटो एडिटिंग अ‍ॅप्सचाही परिणाम

यासोबतच, जे व्यक्ती सोशल मीडियावर आपले फोटो अपलोड करण्यापूर्वी फोटो एडिटिंग अ‍ॅप्स (Photo Editing Apps) वापरुन ते एडिट करतात; त्या व्यक्तींनाही नॉन-सर्जिकल किंवा सर्जिकल कॉस्मेटिक प्रोसीजर करण्याची भरपूर इच्छा होते असंही यामध्ये म्हटलं आहे.

या संशोधनाच्या ऑथर नीलम वाशी यांनी सांगितलं, की कोरोना (Covid Pandemic) काळामध्ये देखील कॉस्मेटिक्स बाबत लोकांचा फोकस वाढला होता. अर्थात, त्यानंतर आतापर्यंत लोकांना अशा सर्जरींबाबत उत्सुकता निर्माण करणारं कोणतंही थेट कारण किंवा दुवा समोर आला नव्हता. नीलम या बोस्टन युनिवर्सिटी कॉस्मेटिक अँड लेझर सेंटरमध्ये असोसिएट प्रोफेसर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT