sunita williams space station air leak news esakal
विज्ञान-तंत्र

Sunita Williams Latest Update : अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्ससाठी धोका वाढला? स्पेस स्टेशनवर मोठ्या प्रमाणावर हवा गळती सुरू

sunita williams space station air leak news : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) 2019 पासून सुरू असलेल्या हवेच्या गळतीच्या समस्येत अलीकडेच वाढ झाली आहे. ही गळती स्थानकाच्या रशियन विभागात झाली असून, दररोज सुमारे 1.7 किलो हवा गळत आहे.

Saisimran Ghashi

Sunita Williams News : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) 2019 पासून सुरू असलेल्या हवेच्या गळतीच्या समस्येत अलीकडेच वाढ झाली आहे. ही गळती स्थानकाच्या रशियन विभागात झाली असून, दररोज सुमारे 1.7 किलो हवा गळत आहे. या परिस्थितीमुळे NASA ने याला जास्त जोखीम असलेली समस्या म्हणून ओळखले आहे, विशेषतः सुनीता विल्यम्स (Sunita Williams in Space) यांच्यासह इतर अंतराळवीर तिथे उपस्थित असल्याने हे जास्त धोक्याचे आहे. NASA सध्या हवेची गळती थांबवण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न करत आहे, मात्र हे आव्हान दीर्घकालीन अंतराळ संशोधनासाठी नवीन संकट निर्माण करणारे आहे,असे वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिले आहे.

रशियन झ्वेझ्दा मॉड्यूलमधील प्रॉब्लेम आणि NASA चे उपाय गळती झ्वेझ्दा मॉड्यूलच्या एका व्हेस्टिब्यूल भागात आढळली आहे. या समस्येवर मात करण्यासाठी NASA ने अनेक उपाय योजले असले तरीही गळतीच्या वेगात वाढ झाली आहे. एप्रिल 2024 पर्यंत, दररोज 1.7 किलो हवेचे नुकसान (Space station air leak) होत असल्याचे NASA च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. ही गंभीर परिस्थिती पाहता, अंतराळ स्थानकाच्या सुरक्षिततेवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो, असे तज्ञांचे मत आहे.

अंतराळवीरांच्या सुरक्षिततेवर परिणाम

गळती गंभीर असली तरी सध्या NASA ने कोणतेही तत्काळ धोके नसल्याचे स्पष्ट केले आहे. सध्याच्या 7 अंतराळवीरांच्या सुरक्षेवर विशेष लक्ष दिले जात आहे. NASA आणि रशियन अंतराळ संस्था रोसकोसमॉसने संयुक्तरित्या उपाययोजना केल्या आहेत. गळतीच्या भागाला शक्यतो बंद ठेवले जाते जेणेकरून अंतराळ स्थानकातील हवा कमी प्रमाणात गळेल.

गळतीची कारणे आणि NASA चे यावर संशोधन NASA ने या समस्येवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवले असून गळतीचा वेग एक तृतीयांश कमी झाला आहे. गळतीचे मूळ कारण शोधण्यासाठी NASA तातडीने प्रयत्न करत आहे. संशोधनात आतील आणि बाहेरील वेल्डिंगमधील त्रुटींचा अभ्यास केला जात आहे.(International Space Station) जर गळतीमध्ये आणखी वाढ झाली तर NASA आणि रोसकोसमॉसला त्या भागाचे कायमस्वरूपी बंद करावे लागू शकते. परंतु, त्यामुळे रशियन यानांसाठी docking ports ची समस्या निर्माण होऊ शकते.

ISS आणि अंतराळ संशोधनातील आव्हाने बरीच आहेत. हवेची गळती ही ISS वरील एकमेव समस्या नाही. (space station air leak news) NASA ला याशिवाय अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो आहे, जसे की वस्तूंची पूर्तता, अंतराळातील अवशेषांमुळे निर्माण होणारी जोखीम, तसेच Boeing च्या CST-100 Starliner यानाच्या प्रमाणपत्राबाबत अडचणी. ISS च्या यशस्वी व्यवस्थापनासाठी ही सर्व आव्हाने पार करणे अत्यावश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Interview : ‘लाडकी बहीण’च्या यशामुळे ‘पंचसूत्री’चा घाट! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा

Maharashtra Assembly Election : विधानसभा निवडणूक काळात राज्य शासनाचा मोठा निर्णय, राज्यातील 'या' शाळा आजपासून सहा दिवस राहणार बंद

Prataprao Pawar : ‘ग्लोबल प्राइड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्काराने प्रतापराव पवार यांचा लंडनमध्ये सन्मान

Kartik Purnima 2024 Wishes: आज कार्तिक पौर्णिमा, देव दिवाळीनिमित्त प्रियजनांना द्या मराठीतून खास शुभेच्छा

ढिंग टांग : तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण…?

SCROLL FOR NEXT