Text Neck Syndrome esakal
विज्ञान-तंत्र

Health Alert : अलर्ट! ७३% कॉलेजकुमारांना ‘टेक्स्ट नेक सिंड्रोम’; मोबाईल-संगणकाच्या वापराने होताहेत गंभीर परिणाम

Text Neck Syndrome : विविध महाविद्यालयांच्या कॅम्पसमधील सुमारे २१ वर्षे वयोगटातील ७३ टक्के तरुणांमध्ये टेक्स्ट नेक सिंड्रोम हा विकार आढळून आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Text Neck Syndrome Research : विविध महाविद्यालयांच्या कॅम्पसमधील सुमारे २१ वर्षे वयोगटातील ७३ टक्के तरुणांमध्ये टेक्स्ट नेक सिंड्रोम हा विकार आढळून आला आहे. याबाबतचे सर्वेक्षण व अभ्यास सांगलीचा व सध्या लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या पारस पाटील या विद्यार्थ्याने अभ्यासासाठी सर्व्हे केला होता. तो त्याने पुण्यातील बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या ‘रेस्पायर- २०२४’ या राज्यव्यापी स्पर्धेत सादर केला असता रौप्यपदक मिळाले आहे.

मोबाईलच्या वापराबरोबरच आरामदायी जीवनशैली, स्थूलता चुकीची बैठक पद्धती अशी या आजाराची कारणे आहेत. आजकाल सोशल मीडिया, स्मार्टफोन आणि टॅबलेटचा वापर, वर्क फ्रॉम होमचे कल्चर यामुळे या आजाराची व्याप्ती वाढत आहे. मुळचा सांगलीचा असलेल्या पारस सध्या लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तिसऱ्या वर्षात एमबीबीएसला आहे. त्याने २३३ विद्यार्थी अभ्यासाठी निवडले. ज्यांना जन्मजात व्याधी आहे अथवा ज्यांचे मानेचे ऑपरेशन झाले आहे त्यांना यातून वगळले आहे.

स्मार्टफोनच्या वापराचे दहा प्रश्नांच्या आधारे विद्यार्थ्यांनी एक ते सहा अशा गटात वर्गवारी केली. त्यानुसार आलेली निरिक्षणे अशी आहेत की, एकूण ७४ टक्के विद्यार्थ्यांना मानेच्या समस्या आहेत, ज्यांचे सरासरी वय केवळ २१ वर्ष आहे. यापैकी तब्बल ४८ टक्के विद्यार्थ्यांना समाजमाध्यमांच्या आहारी गेले आहे. त्यांच्यात पाठीचे दुखणे आणि मानेचे दुखणे तसेच मानेचे आखडणे असे विकार ठळक दिसतात. सर्वाधिक म्हणजे यातील ८३ टक्के मुले ई-लर्निंगसाठी मोबाईल वापर करतात. त्यातील ६७ टक्के मुले ई-लर्निंगबरोबरच व्हाॅट्सअॅप, इंस्टाग्राम स्क्रोलिंग आणि चित्रपट पाहण्यासाठीही करतात.

ठळक निरीक्षणे

  • ४० टक्क्यांचा सहा तासांपेक्षा अधिक, तर ४५ टक्क्यांचा तीन तासांपर्यंत रोजचा मोबाईल वापर.

  • झोपण्यापूर्वी ८८ टक्के मुले झोपण्यापूर्वी मोबाईलचा वापर करतात, ज्याचे झोपेवर दुष्परिणाम होतात.

  • ९० टक्क्यांहून अधिक जणांचा मोबाईल पाहतानाचा मानेचा कोन १५ ते ४५ अंशा असा चुकीचा असतो.

  • सलग १५ ते ३० मिनिटांपर्यंत मोबाईल पाहणारे ६२ टक्के विद्यार्थी आहेत.

  • समाजमाध्यमांवर राहणारे ४५ टक्क्यांहून अधिक विद्यार्थी तीन तासांहून अधिक आहेत.

  • ३४ टक्के पाच तासापर्यंतचा वेळ समाजमाध्यमांवर घालवतात.

  • मुली आणि मुले यांच्यात ही समान निरीक्षणे आहेत.

कोणती काळजी घ्याल?

  • नियमितपणे मानेच्या स्नायूंना शक्ती प्राप्त होईल, असे व्यायाम करावेत.

  • आपले वजन मर्यादेमध्ये राहील, याची काळजी घ्यावी.

  • आपल्या स्क्रीन टाईमच्या दरम्यान वरचेवर विश्रांती घ्यावी.

  • सोशल मीडियाच्या वापराबाबत चोखंदळ आणि संयमी राहायला हवे.

  • संगणक टेबलवर काम करताना घ्यायची दक्षता

१) पाठ , २) मांडी, ३) गुडघा, ४) मॉनिटरची उंची, ५) मॉनिटरचे अंतर, ६) हाताची स्थिती, ७) पावलांची स्थिती

मोबाईल, टॅबलेट आणि इतर साधनांकडे सतत खाली पाहत राहणे यामुळे मानेचे स्नायू, कन्डरा आणि मणके यांच्यावर खूप ताण येतो. त्यामुळे मान,खांदा, डोके आणि पाठीचा वरचा भाग दुखणे, मानेची मर्यादित हालचाल होणे असे विकार बळावतात. पुढे जाऊन मानेची चकती बाहेर येणे, चेतातंतू दबले जाणे, स्नायूंची शक्ती कमी जास्त होणे अशा गंभीर समस्या उद्‍भवतात. ऐरवी सार्वत्रिक आढळणाऱ्या या समस्येचे वास्तव या अभ्यासातून पुढे येते,असे पारस पाटील याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Satta Bazar: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? सट्टाबाजारात कोणाला पसंती? कोणाची सत्ता येणार?

Nashik Vidhan Sabha Election: मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर जिल्ह्यात विक्रमी मतदान; 2009 च्या निवडणुकीत 60 टक्के, तर यंदा 69.12 टक्क्यांवर

आलिया कपडे बदलत असताना तो सतत तिच्यावर... इम्तियाज अली यांनी सांगितली ती घटना; म्हणाले- त्याला मी पाहिलं तेव्हा

Sangli MIDC Fire : सांगली एमआयडीसीतील केमिकल कंपनीत वायू गळती; दोघांचा मृत्यू, 10 जणांची अवस्था गंभीर

Nashik Police : मतमोजणी केंद्राभोवती कडेकोट सुरक्षा तैनात; सशस्त्र आयटीबीपीची करडी नजर

SCROLL FOR NEXT