Tv Switch Off  
विज्ञान-तंत्र

टीव्ही रिमोटने बंद करत असाल तर... ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची

टीव्ही बघितल्यानंतर तुम्ही तो कसा बंद करता यालाही महत्व आहे

सकाळ डिजिटल टीम

टीव्ही बघून झाल्यावर भारतातील जवळपास 70% कुटुंबे रिमोट कंट्रोलने टिव्ही बंद करतात. पण मुख्य स्विचवरून टीव्ही सेट बंद करत नाहीत त्यामुळे त्याचा मासिक बिलावर परिणाम होतोय.

भारतात अनेक घरांमध्ये टीव्ही आवर्जून पाहिला जातो. किंबहुना करमणुकीचं ते एक मोठे माध्यम आहे. मात्र टीव्ही (TV) बघितल्यानंतर तुम्ही तो कसा बंद करता यालाही महत्व आहे. कारण त्याच्या तुमच्या मासिक वीज बिलावर परिणाम होत असतो. पण तुम्हाला माहितेय का टीव्ही बघून झाल्यावर भारतातील जवळपास 70% कुटुंबं (Family) रिमोट कंट्रोलने टिव्ही बंद करतात. पण मुख्य स्विचवरून टीव्ही सेट बंद करत नाहीत त्यामुळे त्याचा मासिक बिलावर परिणाम होतोय.

रिमोटद्वारे बंद केलेले टीव्ही हे पूर्ण बंद होत नाहीत उलट ते वीज जाळतात. असे वाढणारे बिल घरगुती बजेटमध्ये विचारात घेतले जात नाही. त्यामुळे लोकांना काही टिप्स माहित असणे गरजेचे आहे. कारण त्यामुळे त्यांची वीज वाचविण्यात मदत होईल. महत्वाचे म्हणजे, इलेक्ट्रॉनिक वस्तू स्टँडबायवर ठेवू नयेत कारण ते सुप्त मोडवर चालू ठेवण्यासाठी प्लग सॉकेटमधून वीज वापरत असतात. म्हणजेच याचा अर्थ असा की, जेव्हा तुम्ही टीव्ही रिमोटने बंद करता तेव्हा तो पूर्णपणे बंद होत नाही. उलट टिव्ही चालूच राहून उर्जा अधिक वापरतो. परिणामी बटन चालू राहिल्याने वीजही चालू राहते. याविषयीने झी न्यूज हिंदीने अहवाल दिला आहे.

watching TV

स्टँडबायवर टीव्ही किती वीज वापरतो?

स्टँडबायवर टीव्हीद्वारे किती वीज वापरली जाते हे त्याचे तंत्रज्ञान, मॉडेल, आकार तसेच कार्यक्षमता यावर अवलंबून असते. सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे पॉवर रेटिंग असते. त्यानुसार ग्राहकांना गॅझेट कार्य करण्यासाठी किती वीज वापरेल, हे सांगितले जाते. हे रेटिंग साधारणपणे वॅट किंवा किलोवॅटमध्ये दिले जाते. तज्ञांच्या मते, स्टँडबायवर एक टीव्ही प्रति तास 10 वॅट्सपर्यंत वीजेचा वापर करू शकतो. हे तुमचा वैयक्तिक वापर, भौगोलिक स्थान यांसारख्या घटकांवर आधारित असून हे प्रमाण बदलूही शकते. टीव्हीला स्टँडबायवर ठेवून फक्त रिमोट कंट्रोलद्वारे बंद ठेवल्यामुळे तुमचे मासिक वीज बिल 100 रुपयांनी वाढू शकते. टीव्ही हा एअर कंडिशनर किंवा हीटर सारखे उपकरण नसल्यामुळे, हा अपव्यय मोठा होतो. त्यामुळे तुम्ही जर वर्षभराचे बील पाहिले तर तुमचा खर्च १२०० रूपये जास्त असल्याचे लक्षात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Shiv Sena Shinde Vs Thackeray: गद्दारीचा आरोप झालेल्या शिंदे सेनेला मतदारांची साथ! ठाकरेंची सेना पिछाडीवर; जाणून घ्या आकडेवारी

SCROLL FOR NEXT