Tata Motors ने आज ग्राहकांची प्रतिक्षा संपवत नवीन Nexon EV Max ही कार 17.74 लाख रूपयाच्या (एक्स-शोरूम ऑल इंडिया) किमतीत लॉन्च केली. नवीन Nexon EV Max हाय व्होल्टेज Ziptron तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. हे Nexon EV Max XZ+ आणि Nexon EV Max XZ+ Lux या दोन ट्रिम पर्यायांसह येते.
ही कार 3 रंग पर्याय - इंटेन्स-टील, डेटोना ग्रे आणि प्रिस्टाइन व्हाइटमध्ये सादर करण्यात आली आहे. यामध्ये ड्युअल टोन बॉडी कलर स्टँडर्ड म्हणून देण्यात आला आहे. Tata Nexon EV Max च्या हाय-एंड मॉडेलची किंमत 19.24 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.
यामध्ये 40.5 kWh लिथियम-आयन बॅटरी पॅकसह सुसज्ज आहे जे नवीन Nexon EV Max 33% अधिक बॅटरी क्षमता देण्यात आली आहे. हे एका पूर्ण चार्जवर 437 किमीची ARAI सर्टिफाईड रेंज देते. Nexon EV MAX 105 kW (143 PS) पॉवर जनरेट करते.
Tata Nexon EV Max 3.3 kW चार्जर किंवा 7.2 kW AC फास्ट चार्जर पर्याय दिले आहेत. त्याचा 7.2 kW AC फास्ट चार्जर घर किंवा ऑफिसमध्ये इंस्टॉल केला जाऊ शकतो, ज्यामुळे बॅटरी फुल चार्जिगसाठी फक्च 6.5 तासांचा वेळ लागतो. कंपनीचा दावा आहे की, Nexon EV Max कोणत्याही 50 kW DC फास्ट चार्जरने फक्त 56 मिनिटांत 0 - 80 टक्के चार्ज होते.
Nexon EV Max मध्ये 3 ड्रायव्हिंग मोड इको, सिटी आणि स्पोर्ट आहेत. यात अपग्रेडेड ZConnect 2.0 कनेक्टेड कार टेक्नोलॉजी देण्यात आले आहे ज्यामध्ये आठ नवीन फीचर्स उपलब्ध आहेत. ZConnect अॅपमध्ये 48 कनेक्टेड कार फीचर्स ऑफर करण्यात आले आहेत. हे डीप ड्राईव्ह अॅनालिटिक्स आणि डायग्नोस्टिक्समध्ये मदत करेल. अॅड-ऑन फीचर्समध्ये स्मार्टवॉच इंटिग्रेशन, ऑटो/मॅन्युअल डीटीसी चेक, चार्जिंग लिमीट सेट करणे, मंथली व्हेयकल रिपोर्ट्स आणि इनव्हांस ड्राइव्ह एनालिटीक्सचा देखील समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.