Tata motors launches tata Tata Nexon 4 new variants to mark 3 lakh units mark check details 
विज्ञान-तंत्र

Tata Nexon चे 4 नवीन व्हेरिएंट लॉंच, मिळणार हे मस्त फीचर्स, पाहा किंमत

सकाळ डिजिटल टीम

भारतातील पहिल्या GNCAP 5 स्टार रेटेड कारच्या रोल आउटचा आनंद साजरा करताना, टाटा मोटर्स (Tata Motors) ने आज पुण्यातील रांजणगाव कारखान्यातून 3,00,000 वी नेक्सॉन (Tata Nexon) कार बाजारात रोलआउट केली. जून 2021 मध्ये कारखान्यातून 2,00,000 कार बाहेर पडल्यानंतर टाटा मोटर्सने अवघ्या 8 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत नेक्सॉनच्या विक्रमी 1 लाख युनिट्सचे उत्पादन केले आहे.

नेक्सॉन ही भारतातील आणि कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमधील टॉप 5 सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक आहे. भारतातील टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक वाहन व्यवसायात नेक्सॉनने त्याच्या सेगमेंटमधील सर्वाधिक योगदान दिले आहे. Tata Nexon EV चे आजपर्यंत 13500 पेक्षा जास्त ग्राहकांनी विकत घेतली आहे, ज्याचा बाजार हिस्सा 62 टक्क्यांहून (YTD) अधिक आहे .

Nexon चे 4 नवीन व्हेरिएंट लाँच

कंपनीने याच यशाचा आनंद साजरा करताना, आज यशस्वी कॉम्पॅक्ट SUV च्या टॉप ट्रिम्सचे 4 नवीन व्हेरिएंट XZ+ (P) / XZA+ (P) आणि XZ+ (HS) / XZA+ (HS) पेट्रोल आणि डिझेलसह नवीन रॉयल ब्लू कलरमध्ये लॉन्च केले. हे व्हेरिय़ंट

हे व्हेरिएंट्स डार्क अवतारमध्येही सादर केले जातील. आजपासून सुरू होणाऱ्या बुकिंगसह, नवीन व्हेरिएंट टाटा मोटर्सच्या सर्व अधिकृत डीलरशिपवर उपलब्ध होतील. नवीन Nexon XZ+ (P)/XZA+ (P) व्हेरिएंट अनेक प्रीमियम फीचर्सनी सुसज्ज असेल. यात प्रीमियम बेनेक कॅलिको लेदरेट व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, एअर प्युरिफायर आणि ऑटो डिमिंग IRVM मिळेल.

किंमत किती असेल?

नुकत्याच लाँच झालेल्या काझीरंगा एडिशनसह, नेक्सॉन आता 40 व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार निवडण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध होतील. या रेंजमध्ये पेट्रोलमधील 22 व्हेरिएंट आणि डिझेलमधील 18 व्हेरिएंट स्वयंचलित आणि मॅन्युअल ट्रान्समिशन पर्यायांसह असतील. दरम्यान या नवीन Tata Nexon ची ही किंमत 10.86 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Shiv Sena Shinde Vs Thackeray: गद्दारीचा आरोप झालेल्या शिंदे सेनेला मतदारांची साथ! ठाकरेंची सेना पिछाडीवर; जाणून घ्या आकडेवारी

SCROLL FOR NEXT