Tata Tigor CNG And Tiago CNG Launch 
विज्ञान-तंत्र

Tata च्या दोन नवीन CNG कार लॉंच; जाणून घ्या किमती-फीचर्ससह सर्वकाही

सकाळ डिजिटल टीम

Tata Tigor CNG And Tiago CNG Launch : Tata Motors ने आज Tiago आणि Tigor चे CNG व्हेरिएंट लॉन्च केले आहेत. ही वाहने सादर केल्यामुळे, टाटाने भारतातील फॅक्टरी-फिटेड सीएनजी पॅसेंजर कारच्या लीगमध्ये दमदार एंट्री केली असून मारुती सुझुकी (Maruti Suzuki) आणि ह्युंदाई (Hyundai) आधीच त्यांच्या कार या सेगमेंटमध्ये विकतात. टाटाने आय-सीएनजी तंत्रज्ञानासह हे सीएनजी व्हेरिएंट (Tata CNG Cars) लॉन्च केले आहेत. जे या वाहनांना चांगला परफॉर्मन्स देण्यासाठी मदत करेल.

Tiago CNG आणि Tigor CNG सह, Tata Motors ही Hyundai नंतर पेट्रोल, डिझेल, CNG आणि इलेक्ट्रिक पॉवरट्रेनसह कार ऑफर करणारी भारतातील दुसरी ऑटोमेकर बनली आहे.

टाटा टिगोर सीएनजी (tata tigor cng)

Tata Tiago CNG ची किंमत 6.09 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते, तर Tata Tigor CNG ची किंमत 7.69 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. टाटा मोटर्सने पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींसोबतच वातावरणावर होणारा त्यांचा परिणाम लक्षात घेऊन सीएनजी रेंज लॉन्च केली आहे. Tiago आणि Tigor CNG च्या मायलेजचा तपशील टाटाने अजून उघड केलेला नाही. पण नुकतीच लाँच झालेली मारुती सेलेरियो सीएनजी 35.60 किमी/किलो मायलेज देते.

टाटा टियागो सीएनजी कॉस्मेटिकली स्टँडर्ड मॉडेलसारखीच आहे. हॅचबॅकमध्ये फॅक्टरी-फिट केलेले CNG किट हा एकमेव बदल आहे जो 1.2-लीटर रेव्होट्रॉन इंजिनसह येतो. इंजिन 73 PS चा पॉवर आउटपुट देते. तसेच या कारला 165 मिमी ग्राउंड क्लीयरन्ससह मिळतो.

फीचर्स

कारला प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स, ग्रिलवर क्रोम ट्रिम्स मिळतात. केबिनमध्ये हरमन टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम उपलब्ध असून Tata Tiago CNG 5 वेगवेगळ्या रंगांच्या पर्यायांमध्ये आणि चार व्हेरिएंट XE, XM, XT आणि XZ+ मध्ये येईल. हॅचबॅकचे कलर ऑप्शन्स मिडनाईट प्लम, ऍरिझोना ब्लू, ओपल व्हाइट, फ्लेम रेड आणि डेटोना ग्रे आहेत.

टाटा टिगोर सीएनजी (Tata Tiago CNG)

CNG व्हेरियंट लॉन्च करून पेट्रोल, ऑल-इलेक्ट्रिक आणि CNG प्रकार असलेली Tata Tigor ही भारतातील पहिली कार बनली आहे. Tiago CNG प्रमाणे, Tigor CNG ला फॅक्टरी फिट केलेले CNG किट मिळते जे 1.2-लीटर रेव्होट्रॉन पेट्रोल इंजिनसह येते.

फीचर्स

या कारमध्ये ऑटोमॅटिक हेडलँप, ड्युअल-टोन रूफ, रेन सेन्सिंग वायपर इत्यादी फीचर्स मिळतात. तर केबिनच्या आत, याला ऑटोमॅटिक क्लायमॅट कंट्रोल, सात इंची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळते. Tata Tigor CNG 4 वेगवेगळ्या कलर ऑप्शन्समध्ये आणि 2 व्हेरिएंटमध्ये येते, जे XZ आणि XZ+ आहेत. या कारच्या कलर ऑप्शन्समध्ये तुम्हाला मॅग्नेटिक रेड, अॅरिझोना ब्लू, ओपल व्हाइट, डेटोना ग्रे आणि डीप रेड मिळतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT