Tata Upcoming Cars : टाटाने प्रिमियम हॅचबॅक सेगमेंटमध्ये त्यांची एन्ट्री 2020 मध्ये त्यांच्या अल्ट्रोजच्या माध्यमातून केली होती. तेव्हापासून आतापर्यंत मार्केटमध्ये या मॉडेलचं चांगलं प्रदर्शन बघायला मिळालं आहे. आता कंपनी त्यांचा सेल वाढवण्यासाठी या वर्षात कारचे आणखी दोन व्हरिएंट लाँच करणार आहे. कंपनीने त्यांचे दोन मॉडेल ऑटो एक्स्पोमध्ये शोकेसही केले होते. चला तर या कारचे फिचर्स आणि खासियत जाणून घेऊया.
टाटाच्या जवळपास सगळ्याच कारची मार्केटमध्ये जोरदार चर्चा दिसून येते. तसेच त्याची विक्रीही चांगली आहे.
टाटा अलट्रोज सीएनजी
कंपनी सीएनजी ऑप्शनमध्ये 1.2 L पेट्रोल इंजिनसह आपली कार आणेल, जी सीएनजी मोडवर 77 पीएस पॉवर आणि 95 एनएम टॉर्क देण्यास सक्षम असेल. जिला 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये सादर केले जाईल. विशेष म्हणजे कंपनी या कारमध्ये 30 लिटर क्षमतेसह ड्युअल सिलेंडरचा सेटअप देईल. जे इंजिन कंट्रोल युनिट (ईसीयू) शी जोडले जाईल. तसेच, त्यात लीकेज डिटेक्शन टेक्नोलॉजी सुद्धा असेल. या व्यतिरिक्त, फास्ट सीएनजी रीफ्यूलिंग आणि ऑटो इंधन स्विच यासारखी वैशिष्ट्ये देखील त्यात दिसून येतील.
टाटा अलट्रोज रेसर
टाटा कंपनीची टाटा रेसर ह्युंदईची I-20 एन लाइनशी स्पर्धा करणार आहे. जी 118 bhp जी सीएनजी मोडवर 77 पीएस पॉवर आणि 95 एनएम टॉर्क देण्यास सक्षम असेल. ही कार 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये सादर केले जाईल. विशेष म्हणजे कंपनी या कारमध्ये 30 लिटर क्षमतेसह ड्युअल सिलेंडरची सेटअप देईल. जे इंजिन कंट्रोल युनिट (ईसीयू) शी जोडले जाईल. तसेच, त्यात लीकेज डिटेक्शन टेक्नोलॉजी उपस्थित असेल. या व्यतिरिक्त, फास्ट सीएनजी रीफ्यूलिंग आणि ऑटो इंधन स्विच यासारखी वैशिष्ट्ये देखील त्यात दिसून येतील. (Tata Motors)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.