Tata Nano EV May launch Soon: टाटा मोटर्सने २००८ साली आपली पिटुकली कार टाटा नॅनोला (Tata Nano) लाँच केले होते. किंमत व आकारामुळे ही कार विशेष चर्चेत आली होती. आता टाटा नॅनो पुन्हा एकदा चर्चेत आहे. रिपोर्टनुसार, कंपनी नवीन बदलांसह या स्वस्त कारचे इलेक्ट्रिक मॉडेल लाँच करण्याची शक्यता आहे. लाँचिंगनंतर कार जास्त लोकप्रिय ठरली नव्हती. त्यानंतर कंपनीने २०१८ ला कारचे उत्पादन बंद केले होते. त्यामुळे नॅनो इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये आल्यास लोकांचा कसा प्रतिसाद मिळेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
गेल्याकाही वर्षात इलेक्ट्रिक व्हीकल मार्केट वेगाने वाढत आहे. त्यामुळे कंपनी देखील नॅनोच्या अपग्रेडेशनवर विचार करत आहे. मात्र, कंपनीने अद्याप यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
हेही वाचा- Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?
इलेक्ट्रिक व्हीकल सेगमेंटमध्ये कंपन्या एकमेकांना टक्कर देण्यासाठी अनेक शानदार कार लाँच करत आहे. इतर कंपन्यांप्रमाणे टाटा मोटर्स देखील या सेगमेंटमध्ये दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. आर्थिक वर्ष २०२१ मध्ये कंपनीने ५ हजार, तर आर्थिक वर्ष २०२२ मध्ये १९५०० इलेक्ट्रिक वाहनांची विक्री केली आहे. या आर्थिक वर्षात ५० हजार आणि २०२४ मध्ये १ लाख इलेक्ट्रिक वाहनांची विक्री करण्याचे लक्ष्य कंपनीचे आहे. विशेष म्हणजे कंपनीने एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान २४ हजारांपेक्षा जास्त इलेक्ट्रिक वाहनांची विक्री केलीये.
टाटाच्या इतरही इलेक्ट्रिक वाहनांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. Nexon EV, Tigor EV, Tiago EV आणि Xpres-T EV या वाहनांना ग्राहकांची चांगली पसंती मिळाली आहे. पुढील काही वर्षात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांना लाँच करणार असल्याचेही कंपनीने म्हटले आहे.
या लिस्टमध्ये नॅनोचा समावेश झाल्यास सर्वसामान्यांना इलेक्ट्रिक व्हीकल्सकडे स्विच होण्यास नक्कीच फायदा होईल. २००८ साली लाँच झालेल्या मूळ मॉडेलप्रमाणेच टाटा नॅनो इलेक्ट्रिक व्हर्जनची किंमत देखील कमी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.