tata motors offers up to 40000 rupee discount on tata safari harrier nexon in february check details  
विज्ञान-तंत्र

Tata Safari, Harrier अन् Nexon वर फेब्रुवारीत 40 हजारांपर्यंत सूट

सकाळ डिजिटल टीम

तुम्ही वाहन खरेदीचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे, कारण Tata Motors ही फेब्रुवारी 2022 महिन्यात त्यांच्या अनेक वाहनांवर मोठा डिस्काउंट आणि इतर ऑफर देत आहे. कंपनी Tiago, Tigor, Nexon, Harrier आणि Safari वर तब्बल 40,000 रुपयांपर्यंतचे बेनिफिट्स देत आहे. ग्राहक या एक्सचेंज बोनस, कॅश एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट बेनिफिट्सचा लाभ घेऊ शकतात.

कंपनी नवीन Tata Tiago आणि Tigor वर 10,000 रुपयांची कॅश डिस्काउंट आणि 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस देत आहे. दरम्यान, या ऑफर Tiago CNG आणि Tigor CNG वर लागू नाहीत. याशिवाय, ग्रामीण लाभ म्हणून 2500 रुपये, कॉर्पोरेट लाभ म्हणून 3,000 आणि आरोग्य कर्मचार्‍यांना 3,000 रुपयांचा लाभ देण्यात येत आहे.

Nexon वर ऑफर

टाटा नेक्सॉन कॉम्पॅक्ट SUV वर 15,000 चा एक्सचेंज बोनस, कॉर्पोरेट आणि हेल्थ वर्कर स्कीम अंतर्गत पेट्रोल ट्रिमवर 3,000 आणि डिझेल वाहनांवर 5,000 ऑफर करत आहे. ही ऑफर डार्क एडिशन रेंज वगळता संपूर्ण Nexon रेंजवर लागू आहे.

Tata Safari, Harrier वर ऑफर

टाटा हॅरियर आणि सफारीवर 40,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस देत आहे. याव्यतिरिक्त, हॅरियरला ग्रामीण लाभ, कॉर्पोरेट सूट आणि आरोग्य कर्मचार्‍यांसाठी 5,000 रुपयांची सूट देखील मिळेल. ही ऑफर कारच्या सर्व प्रकारांवर लागू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT