Tata motors  google
विज्ञान-तंत्र

Tata motors : 'पॉवर ऑफ 6' चे मुंबईत आयोजन

अद्वितीय ‘पॉवर ऑफ ६’ एक्स्पो परिसंस्‍था भागधारकांना नवीनतम ऑफर समजून घेण्यास आणि अनुभवण्यास सक्षम करेल.

नमिता धुरी

मुंबई : टाटा मोटर्स ही भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनी १९ व २० सप्टेंबर २०२२ रोजी मुंबईमध्‍ये ‘पॉवर ऑफ ६’ एक्स्पोचे आयोजन करत आहे. या दोन दिवसांच्‍या एक्‍स्‍पोचे लक्ष्य ग्राहकांमध्ये टाटा मोटर्सच्या मोबिलिटी सोल्यूशन्सबद्दल जागरुकता निर्माण करण्याचे आहे.

या एक्स्पोमध्ये टाटा मोटर्सच्या एमएचआयसीव्‍ही (मध्यम, जड आणि मध्यवर्ती व्यावसायिक वाहने)च्या विस्तृत श्रेणीतील निवडक मॉडेल्स आणि ग्राहक केंद्रित मूल्यवर्धित सेवा ऑफरसह संपूर्ण सेवा उपक्रमांतर्गत वार्षिक देखभाल करार, फ्लीट व्यवस्थापन, अपटाइम गॅरंटी, इंधन कार्यक्षमता व्यवस्थापन उपक्रम दाखवण्‍यात येतील.

‘पॉवर ऑफ ६’ एक्स्पो कंपनीचे प्रगत कनेक्टेड वाहन प्लॅटफॉर्म फ्लीट एज व त्‍याची कार्यक्षमता आणि फ्लीट मालकांच्या नफ्याची क्षमता सुधारण्यासाठी तिच्या अद्वितीय क्षमतांचे प्रदर्शन देखील करेल. अद्वितीय ‘पॉवर ऑफ ६’ एक्स्पो परिसंस्‍था भागधारकांना नवीनतम ऑफर समजून घेण्यास आणि अनुभवण्यास सक्षम करेल.

टाटा मोटर्सच्या व्यावसायिक वाहनांची श्रेणी ७६ वर्षांहून अधिक काळ राष्ट्रनिर्मितीत योगदान देत आहे. बांधकाम आणि मालवाहतूक विभागातील अग्रणी कंपनीने २ लाखांहून अधिक बीएस-६ एमएचआयसीव्‍ही ट्रक्‍स सादर केले आहेत.

ही श्रेणी विविध लोड बॉडी प्रकार, टिपर, टँकर, बल्कर्स आणि ट्रेलर्स अशा फुली-बिल्‍ट रचनांमध्‍ये उपलब्‍ध आहे. एमएचसीव्‍ही ट्रक्‍सची श्रेणी मार्केट लोड, शेती, सिमेंट, लोखंड व स्‍टील, कंटेनर, वाहन वाहक, पेट्रोलियम, रसायन, पाण्याचे टँकर, एलपीजी, एफएमसीजी, व्‍हाइट गूड्स, नाशवंत वस्तू, बांधकाम, खाणकाम, नगरपालिका कार्यसंचालने अशा सर्वसमावेशक मालांच्या वाहतूकीच्‍या गरजांची पूर्तता करत आहे-.

टाटा मोटर्सची आयसीव्‍ही श्रेणी डिझेल आणि सीएनजी पॉवरट्रेनमध्ये उपलब्ध आहे. ही श्रेणी रचना, कार्यक्षमता आणि विविध उपयोजनांसाठी प्रसिद्ध आहे. झपाट्याने वाढणाऱ्या ई-कॉमर्स विभागाच्या खास गरजा पूर्ण करण्यासाठी आणि ग्राहकांना नफा वाढविण्यात मदत करण्यासाठी ही श्रेणी तयार करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT